Google News : जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरात असणाऱ्या Google या सर्च इंजिनच्या वतीनं ‘सर्च ऑन’ कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. खरेदीचे अनुभव आणखी अविस्मरणीय आणि मजेशीर करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. यासाठी गुगलकडून काही फिचर्सही लाँच करण्यात आली आहेत. (Googles new features made shopping more easy and fun)
दुकानाच्या शब्दानं शोधाशोध...
यापुढे एखादी वस्तू शोधताना सोबतच तिच्या दुकानाबाबतचीही थेट माहिती मिळणार आहे. सौंदर्य प्रसाधनांपासून (Cosmetics) ते अगदी मोबाईल पर्यंतच्या खरेदीसाठी विविध श्रेणींअंतर्गत याचा वापर होणार आहे.
लूक हवाय तरी कसा?
हा फिचर युजर्सना आउटफिट असेंबलसाठी मदत करेल. शिवाय तुम्ही सर्च करत असणारी गोष्ट ट्रेंडमध्ये आहे की नाही हेसुद्धा गुगल सांगणार आहे. ज्यामुळं युजर्सना (User) लेटेस्ट मॉडेल मिळणार आहेत.
Google 3D
मशिन लर्निंगमधील विकासासोबतच गुगल 3D व्हिज्युअल तयार करणार आहे. तुम्ही शोधत असणाऱ्या गोष्टी 360 अंशांत उलटसुलट फिरवून पाहता येणार आहेत.
इतर खरेदीदार काय विचार करतात?
Google app अॅपमध्ये नव्या सुविधेसाठी एक वेबपेज बदलून समोर येईलय ज्यावर खरेदीदार इतरांचे या प्रोडक्टविषयी काय महत्त्वाचं आहे याचा विचार करतात. शिवाय सर्च फिल्टरमध्ये (Filter) असणाऱ्या अनेक गोष्टी तुमचा शोध इथं परिपूर्ण करणार आहेत.