एअरटेलची धमाकेदार ऑफर, चक्क ६० जीबी डेटा मोफत

रिलायन्स जिओची टेलिकॉम इंडस्ट्रीत एन्ट्री झाल्यापासून सुरू झालेलं प्राईस वॉर अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. वेगवेगळा टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लावत आहेत.

Updated: Sep 18, 2017, 01:25 PM IST
एअरटेलची धमाकेदार ऑफर, चक्क ६० जीबी डेटा मोफत title=

मुंबई : रिलायन्स जिओची टेलिकॉम इंडस्ट्रीत एन्ट्री झाल्यापासून सुरू झालेलं प्राईस वॉर अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. वेगवेगळा टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लावत आहेत.

अशात आता एअरटेलने एक धमाकेदार प्लॅन आणला आहे.

एअरटेलचा हा प्लॅन पोस्टपेड ग्राहकांसाठीच आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६ महिन्यांसाठी ६० जीबी डेटा मोफत मिळणार आहे. म्हणजेच दर महिन्याला १० जीबी याप्रमाणे ६ महिन्याला ६० जीबी डेटा मिळणार आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी यूजर्सला फक्त ‘My Airtel App’डाऊनलोड करावं लागेल. अॅप डाऊनलोड केल्यावर एक पेज सुरु होईल. ज्यामध्ये फ्री डेटा प्लॅनबाबत माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, एअरटेलनं याआधी मान्सून डेटा प्लॅन आणला होता. ज्यामध्ये ग्राहकांना तीन महिन्यासाठी ३० जीबी डेटा फ्री देण्यात आला होता. आता कंपनीनं ६० जीबी मोफत डेटा प्लॅन आणून जिओला मोठी टक्कर दिली आहे.