नवी दिल्ली : इंटरनेट युजर्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे.
भारतात 3G नंतर 4Gचं युग आलं आणि नागरिकांमध्ये एकच उत्साहाचं वातावरणं निर्माण झालं. मात्र, आता इंटरनेट युजर्ससाठी आणखीन एक सुखवार्ता आली आहे. कारण, मे महिन्यापासून ग्राहकांना जबरदस्त स्पीडचा अनुभव घेता येणार आहे.
नव्या स्पीडमुळे तुम्ही केवळ एका सेकंदात एक-एक GB चे तीन सिनेमे डाऊनलोड करु शकाल. या व्यतिरिक्त केबल, डिश आणि इंटरनेटच्या तारांपासूनही तुम्हाला सुटका मिळणार आहे. हे सर्व अस्तित्वात येणार आहे ते म्हणजे जीसॅट-11 लॉन्चिंगनंतर. हे सॅटेलाईट फ्रान्सची स्पेस एजन्सी एरियन लॉन्च करणार आहे.
याचं वजन ५७०० किलो आहे. याचा विकास इस्रोचं अहमदाबाद स्थित स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने केलं आहे. हे भारताचं आतापर्यंतचं सर्वात अधिक वजनी सॅटेलाईट आहे. या वजनाचं सॅटेलाईट लॉन्च करण्याची क्षमता नसल्याने हे सोडण्यासाठी इस्रोने एरियनसोबत करार केला आहे. याचं लॉन्चिंग झाल्यानंतर भारताकडे आपलं स्वत:चं सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट असणार आहे. यामुळे आपला इंटरनेट स्पीडही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
या सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट डेटा पाठवण्याचा स्पीड 14GB प्रति सेकंद असणार आहे. सध्या देशभरात डेटा ट्रान्सफर स्पीड काही MB प्रति सेकंदच्या स्पीडने होतो. या सॅटेलाईटच्या मदतीने देशाच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यातून इंटरनेटचा वापर करण्यासाठी डोंगलच्या माध्यमातून आवश्यक सिग्नल्स उपलब्ध होणार आहे. जीसॅट-11 प्रोग्रामला 2009 साली सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती.
हा इस्रोच्या इंटरनेट बेस्ड सॅटेलाईट सीरिजचा एक भाग आहे. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढण्यास मदत होणार आहे. याच्या माध्यमातून अंतराळात 18 महिन्यात तीन सॅटेलाईट्स पाठवण्यात येणार आहेत. पहिलं सॅटेलाईट जीसॅट-19 गेल्यावर्षी जून महिन्यात पाठवण्यात आलं होतं. जीसॅट-11 लवकरच लॉन्च करण्याची तयारी आहे. त्यानंतर जीसॅट-20 वर्षाअखेरीस पाठवण्याची योजना आहे.
या सटेलाईट्समुळे चांगला इंटरनेट स्पीड मिळणार आहे. इंटरनेट कनेक्टिविटी स्वस्त होईल. याच्या माध्यमातून डिश टीव्ही न लावताही तुम्ही टीव्हीवरील प्रोग्राम्स पाहू शकाल.