नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Gionee ने एकत्र ६ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Gionee कडून लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये Gionee M7 प्लस, Gionee F205 आणि Gionee M7 मिनी, Gionee S11, Gionee S11s, Gionee F6 यांचा समावेश आहे.
Gionee M7 हा एक लग्झरी स्मार्टफोन आहे. हा फोनमध्ये २१ कॅरेट गोल्ड प्लेटेड मेटल आणि काल्फस्किन लेदर देण्यात आलंय. हा फोन सुद्धा इतर सगळ्या स्मार्टफोनप्रमाणे बॅजल-लॅस डिझाईनमध्ये आहे. या स्मार्टफोनमध्ये खास ड्युअल सिक्युरिटी एनक्रिप्शन चिप देण्यात आली आहे.
Gionee M7 प्लस मध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. यासोबतच स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरीची सुविधा आहे. मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. तसेच यात 5000mAh बॅटरी आहे. तर हा कंपनीचा पहिला वायरलेस डिवाईस आहे.
Gionee M7 प्लस मध्ये कॅमेरा सेटअप दिलं गेलंय ज्यात १६ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आहे. तेच फ्रन्टसाठी यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड नूगा ऑपरेटींग सिस्टमवर आधारित आहे. यात कनेक्टिव्हीटीसाठी ब्लूटूथ ५.०, ड्युअल सिम, 4G VoLTE, वाय-फाय, मायक्रो यूएसबी पोर्ट, NFC आणि GPS देण्यात आलंय.
Gionee F205 मध्ये ५.४५ इंचाचा डिस्प्ले दिला केलाय ज्याचं स्क्रिन रिझोल्यूशन 1440 x 720 इतकं आहे. यासोबतच मीडियाटेक MT6739 क्वाड स्कोर प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेजची सुविधा आहे. यात ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा दिलाय गेलाय. हा फोन अॅन्ड्रॉईड ७.१ नूगा ऑपरेटींग सिस्टमवर आधारित आहे.
Gionee स्टील ३ म्हणजेच M7 मिनी मध्ये ५.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलाय. ज्याचं रिझोल्यूशन 1440 x 720 पिक्सल आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी सुविधा आहे. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.
यात ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि फ्रन्ट कॅमेरा दोन्ही आहेत. तसेच या AAC 1511 स्पीकर्सही आहे. यासोबतच 4000mAh च्या बॅटरी सोबत हा फोन अॅन्ड्रॉईड ७.१ नूगा ऑपरेटींग सिस्टमवर आधारित आहे.
Gionee M7 प्लसची किंमत ४,३९९ युआन म्हणजे ४३,१५९ रुपये, Gionee F205 ची किंमत ९९९ युआन म्हणजे ९,८०१ रुपये आणि Gionee स्टील ३ ची किंमत १,३९९ युआन म्हणजेच १३,७२५ रुपये इतकी किंमत आहे.