Flipkart वर आज रात्रीपासून जबरदस्त Sale, AC-TV वर तब्बल 75 टक्क्यांची घसघशीत सूट; अजूनही भन्नाट ऑफर्स

Flipkart Sale: फ्लिपकार्टवर आज रात्रीपासून सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये भन्नाट ऑफर देण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्ट एसी आणि टीव्हीवर 75 टक्के सूट देत आहे. इतकंच नाही तर स्मार्टफोनही स्वस्तात उपलब्ध आहेत.   

शिवराज यादव | Updated: May 4, 2023, 03:57 PM IST
Flipkart वर आज रात्रीपासून जबरदस्त Sale, AC-TV वर तब्बल 75 टक्क्यांची घसघशीत सूट; अजूनही भन्नाट ऑफर्स title=

Flipkart Sale: स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करायचा असो किंवा मग एसी (AC), टीव्ही (TV) खरेदी करायचा असो...अनेकजण फ्लिपकार्टवरील (Flipkart) सेल कधी सुरु होईल याची वाट पाहत असतात. याचं कारण म्हणजे या सेलमध्ये मिळणाऱ्या डिस्काऊंटचा फायदा घेत कमी पैशात आपल्याला हव्या त्या वस्तू खरेदी करता येतात. दरम्यान, अनेकजण वाट पाहत असलेला फ्लिपकार्टचा सेल आज रात्रीपासून सुरु होत आहे. आज म्हणजेच गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात होत असून यामध्ये तुम्हाला अनेक भन्नाट ऑफर्स मिळत आहेत. Flipkart Big Savings Days Sale मध्ये बँक ऑफर, डिस्काऊंट आणि इतर फायदे मिळणार आहे. मात्र कंपनीने अद्याप अनेक ऑफर्सची माहिती जाहीर केलेली नाही. 

तुम्ही जर स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर मग हा सेल तुमच्या फायद्याचा आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही iPhone 13 स्वस्तात खरेदी करु शकता. याशिवाय Samsung Galaxy S21 FE 5G वरही आकर्षक ऑफर मिळत आहे. 

तुम्ही डिस्काऊंटचा फायदा घेत 20 हजार 999 रुपयांत Poco X5 Pro 5G खरेदी करु शकता. यशिवाय Redmi Note 12 Pro 5G वरही डिस्काऊंट उपलब्ध आहे. हा फोन ऑफरवर तुम्ही 21 हजार 749 रुपयांत खरेदी करु शकता. तसंच Realme 10 Pro+ 5G 22 हजार 999 रुपयांत उपलब्ध असेल. 

याशिवाय Realme GT Neo 3T हा फोन डिस्काऊंटनंतर 19 हजार 999 रुपयांत उपलब्ध असेल. तर Pixel 6a आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध असेल. Google Pixle 7 देखील तुम्ही स्वस्तात खरेदी करु शकता. Nothing Phone 1 वरही ऑफर उपलब्ध असून हा फोन 27 हजार 999 रुपयांत खरेदी करु शकता. 

याशिवाय टीव्ही आणि इतर घरगुती सामानांवर 75 टक्के भरधोस सूट असणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये 4K टीव्ही फक्त 16 हजार 499 रुपयांपासून उपलब्ध आहे. तसंच वॉशिंग मशीनची किंमत 4990 पासून सुरु होत आहे. याशिवाय रेफ्रिजरेटवरही ऑफ दिली जात आहे. 

दरम्यान इतर घरगुती उपकरणांची सुरुवात 299 रुपयांपासून होत आहे. तर दुसऱ्या उपकरणांवर 70 टक्के सूट मिळत आहे. जर तुम्ही AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर 24 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध आहे. 

सेलमध्ये Thomson च्या टीव्ही, एसी आणि वॉशिंग मशीनवर आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. Thomson चे 24 ते 75 इंचाचे मॉडेल आहेत. तसंच या कंपनीची वॉशिंग मशीन 4 हजार 990 रुपयांपासून सुरु होत आहे. तसंच याच ब्रँडचे एसी 27 हजार 999 रुपयांपासून सुरु होत आहे. 

सेलमध्ये 4 आणि 5 स्टार रेफ्रिजरेटरची किंमत 19 लाख 990 रुपयांपासून सुरु होत आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही डिशवॉशर 19 हजार 490 रुपयांत खरेदी करु शकता. यामध्ये नो कॉस्ट EMO पर्याय मिळत आहे.