मुंबई: फेसबुक आता Whatsapp इतकच अगदी सोपं आणि सुटसुटीत आणि वेगवेगळे फीचर्स घेऊन येत आहेत. आता पुन्हा एकदा फेसबुक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये व्हाइस कॉल आणि व्हिडीओ कॉलचा वेगळा पर्याय आणण्यासंदर्भात फेसबुक त्यावर काम करत आहे. सध्या हे फीचर केवळ मेसेंजर वापरणाऱ्या युझर्सनाच मिळत आहे. मात्र आता सर्व फेसबुक युझर्ससाठी हे फीचर आणण्यासंदर्भात काम सुरू आहे.
यासंदर्भात Bloomberg ने एक रिपोर्ट दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार सध्या हे फीचर्स केवळ मेसेजर वापरणाऱ्यांसाठी आहे. 2014 मध्ये कंपनीने ऑफिशियल मेन एपमधून हे फीचर हटवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे फीचर युझर्ससाठी आणण्यात येणार आहे.
सध्या हे फीचर परदेशात टेस्ट होत असून पुढच्या काही कालावधीमध्ये सर्व युझर्ससाठी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. म्हणजे Whatsapp सारखंच आता फेसबुकच्या मेन अॅपवरही तुम्हाला व्हिडीओ कॉलिंग आणि व्हॉइस कॉलिंग करता येणार आहे. मात्र यामध्ये ग्रूप कॉलिंग असणार आहे का याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती समोर आली नाही.
फेसबुकने सध्या मीट रूम म्हणून फीचर आणलं आहे. ज्यांना ज्यांना तुम्ही व्हिडीओ कॉल करू इच्छीता त्यांना मीट रूमची नोटिफिकेशन पाठवून कॉल करायचा. फेसबुकचं जर हे नवीन फीचर आलं तर मेसेंजरची गरजच उरणार नाही. त्यामुळे युझर्स मेसेंजर वापरणं बंद करतील असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यासाठी मेसेंजरची गरज पडणार नाही.