मुंबई : Samsung सप्टेंबरमध्ये Galaxy M52 5G आणि गॅलेक्सी F42 5G भारतात लाँच करणार आहे. पण त्याआधी कंपनी Galaxy M32 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने या हँडसेटची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये अमेझॉन इंडियावर आधीच जाहीर केली आहेत. सॅमसंगचा लेटेस्ट मिड-रेंजर गॅलेक्सी M32 5G भारतात 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. हा फोन दोन विशिष्ट प्रकारांमध्ये येईल आणि त्याची किंमत 20 हजार ते 25 हजार रुपये असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Galaxy M52 5G स्मार्टफोनची विक्री 2 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Galaxy M32 5G डिव्हाइसला प्रोसेसर सपोर्ट म्हणून, फोन मीडियाटेक डेंसिटी 720 चिपसेटद्वारे काम असेल. Galaxy M32 5G हा फोन, Galaxy M42 5G जी नंतर सॅमसंगचा दुसरा एम सीरीज 5 जी स्मार्टफोन आहे. आगामी 5G क्रांतीसाठी भविष्यात तयार योणार्या 12 5G बँड सपोर्ट यूजर्सला मिळेल. याचा अर्थ हा सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली मिड-रेंज 5G स्मार्टफोन असेल.
Galaxy M32 5G मध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला जाणार आहे. तसेच फोनला हाय रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला दोन वर्षांचे विनामूल्य ओएस अपग्रेड देखील मिळेल. M सीरिजचा USP चालू ठेवत, Samsung Galaxy M32 5G मध्ये 5,000 mAh ची बॅटरी असेल.
या फोनमध्ये 48MP चा क्वाड कॅमेरा सेटअप आणि 13MP चा सेल्फी कॅमेरा असणार आहे. Galaxy M32 5G जी सॅमसंगच्या डिफेन्स-ग्रेड नॉक्स सिक्युरिटीसह येईल, ज्यामुळे तो मिड-सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित स्मार्टफोन सरणार आहे. Galaxy M32 5G ची विक्री Samsung.com, Amazon.in आणि प्रमुख रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल.