Facebook कर्ताधर्त्या Mark Zuckerberg लाच दणका; जे घडलंय ते पाहून म्हणाल, 'कोण नाय कोणचं....'

Facebook Bug: फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब , तुम्हालाही बसला का फटका? जाणून घ्या नेमंक काय घडले  आहे.

Updated: Oct 12, 2022, 12:09 PM IST
Facebook कर्ताधर्त्या Mark Zuckerberg लाच दणका; जे घडलंय ते पाहून म्हणाल, 'कोण नाय कोणचं....'  title=

Facebook Bug: जर तुम्ही फेसबुक वापरकर्ता (facebook Users) असाल तर तुम्ही तुमच्या फॉलोअर्सची काळजी घ्या. कारण फेसबुकवर अशा बगचा हल्ला झाला आहे. ज्यामुळे लोकांचे फॉलोअर्स (facebook followers) रातोरात गायब झाले आहेत. फेसबुकमधील या बगमुळे (Facebook Bug) लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब झाले आहेत. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) देखील यातून सुटलेला नाही. मार्क झुकरबर्गचे केवळ 9,993 फॉलोअर्स उरले आहेत. या फॉलोअर्सची संख्या त्याच्या पेजवर पाहता येईल. 

दरम्यान इतर अनेक युझर्सनंदेखील अचानक फेसबुकवरील फॉलोअर्सची (facebook followers) संख्या कमी झाल्याबद्दल तक्रार केली आहे. बनावट फॉलोअर्सच्या छाटणीचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मार्क झुकरबर्गचे सर्व फॉलोअर्सही बनावट होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाचा : दिवाळी सुट्टीत तिरुमला मंदिरात जाताय तर ही बातमी वाचाच!

दरम्यान, यानंतर अनेक नेटकऱ्यांनी फेसबुकला ट्रोल केलं. काहींनी मिम्स शेअर करत या प्रकाराची खिल्ली उडवली. झुकरबर्गला कोणत्यातरी ज्योतिषानं अशुभ अंक सांगितला आहे. त्यामुळे एका रात्री त्यानं सर्वांना 9 हजारांच्या आत आणलं असं म्हणत एका युझरनं यावर खिल्ली उडवली. 

मेटाने अलीकडेच हाय-एंड रिॲलिटी हेडसेट सादर केले, जे मार्क झुकरबर्गने त्याच्या फेसबुक पेजवर देखील शेअर केले होते. नवीन हेडसेटला Meta Quest Pro असे नाव देण्यात आले आहे आणि त्याची किंमत 1,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 1,23,459 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हेडसेट चेहऱ्यावरील नैसर्गिक भाव देखील ट्रॅक करेल.