फेसबुक इंस्टाग्रामवर 2021 मध्ये हे विषय होते सर्वाधिक चर्चेत; जाणून घ्या इंटरेस्टिंग सर्च

मेटा जे आधी फेसबुक नावाने ओळखले जात होते. मेटाद्वारे 2021 चा आढावा सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 2021 मध्ये कोणत्या शब्दांवर भारतीयांनी सर्वाधिक चर्चा केली. ते सांगण्यात आले आहे.

Updated: Dec 21, 2021, 02:33 PM IST
फेसबुक इंस्टाग्रामवर 2021 मध्ये हे विषय होते सर्वाधिक चर्चेत; जाणून घ्या इंटरेस्टिंग सर्च title=

मुंबई : मेटा जे आधी फेसबुक नावाने ओळखले जात होते. मेटाद्वारे 2021 चा आढावा सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 2021 मध्ये कोणत्या शब्दांवर भारतीयांनी सर्वाधिक चर्चा केली. ते सांगण्यात आले आहे.
यात Facebook आणि Instagram यासह Facebook रीलचे टॉप-ट्रेंडिंग विषय देखील समाविष्ट आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

2021 मध्ये, कोविड महामारी कोविड आणि आरोग्य श्रेणींमध्ये टॉपवर आहेत. या दरम्यान, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर यावर्षी ऑक्सिजन आणि हॉस्पिटल सारखे कीवर्ड ट्रेंडमध्ये होते.

टोकियो ऑलिम्पिकदेखील टॉप ट्रेंडमधील चर्चेचा विषय राहिला आहे. फेसबुक रीलबद्दल बोलायचे झाले तर, टॉप ट्रेंडिंग गाण्यांमध्ये शेरशाह चित्रपटातील राता लांबिया-लंबिया आघाडीवर होते. त्याच वेळी, बचपण का प्यार गाणं रीलच्या टॉप ट्रेंडमध्ये समाविष्ट होते.

आरोग्य श्रेणी

  1. प्रेयर
  2. ऑक्सिजन
  3. लस, वैक्सीन
  4. हॉस्पिटल
  5. फ्लेक्ससीड

क्रीडा श्रेणी

  1. सुवर्ण पदक (गोल्ड मेडल)
  2. टोकियो ऑलिम्पिक
  3. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
  4. महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट
  5. पैराओलंपिक गेम्स

संस्कृतीबाबत

गरबा
कॅप्टन विक्रम बत्रा
स्वतंत्रता दिवस
दागिने (ज्वेलरी)
क्रिप्टोकरन्सी

रीलची टॉप गाणी (90 दिवस शोध ट्रेंड)

राता लंबिया - शेरशाह
Love nwantiti
तू मिलता है मुझे - राज बरमन
तेरे प्यार में - हिमेश रेशमिया
नाम तेरे - Ndee Kundu

रीलचे शीर्ष ट्रेंड

रात लंबिया - शेरशाह
आयफोन लॉक स्क्रीन (एआर इफेक्ट)
बचपन का प्यार
बारिश की जाए
लुट गए