नवी दिल्ली : सण उत्सवाच्या या काळात गेल्या आठवड्याभरात ई-कॉमर्स कंपन्यांनी नऊ हजार कोटींची विक्री केली आहे. शोध कंपनी रेडसीर कंसल्टिंगने यासंदर्भात माहिती देणारा एक रिपोर्ट सादर केला. रिपोर्टनुसार, "ई-कॉमर्स कंपन्यांनी २०-२४ सप्टेंबर या पाच दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री केली आहे. कंपन्यांनी नऊ हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे."
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विक्रीत ४०% वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार एकूण विक्रीत फिल्पकार्ड समूहाचा हिस्सा ५८% तर अमेजनचा २६% हिस्सा आहे.
"जाहिरात, ऑफर आणि सुविधांची योग्य अंमलबजावणीच्या जोरावर या कंपन्यांनी खूप चांगले काम केले आणि आतापर्यंतची सर्वाधिक विक्री केली," असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
४८ तासात १० लाखांहून अधिक स्मार्टफोन्सची विक्री झाली असल्याचा दावा शाओमीने केला आहे. यासंदर्भात कंपनीने ट्विटर अकाउंट पर ट्वीट देखील केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, फ्लिपकार्ट चे बिग बिलियन डेज आणि अमेजनचे ग्रेट इंडिया फेस्टिवलमध्ये त्यांच्या फोन्सची जबरदस्त विक्री झाली.
इतक्या कमी वेळात स्मार्टफोनची शानदार विक्री करणारी भारतातील ही पहिली कंपनी असल्याचा दावा कंपनी करत आहे.