WhatsApp येणारा प्रत्येक कॉल करता येणार रेकॉर्ड, कसं ते जाणून घ्या

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्मार्टफोनचा आत्माच आहे असं म्हणावं लागेल. व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या पाहता कंपनी यात नवनवे फीचर आणत असते. पण कॉल रेकॉर्डिंगचं फीचर नाही. पण तरीही तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता.

Updated: Jan 15, 2023, 06:45 PM IST
WhatsApp येणारा प्रत्येक कॉल करता येणार रेकॉर्ड, कसं ते जाणून घ्या title=

WhatsApp Call Record Know About Trick: व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्मार्टफोनचा आत्माच आहे असं म्हणावं लागेल. व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या पाहता कंपनी यात नवनवे फीचर आणत असते. आता तर व्हॉट्सअ‍ॅप कॉल करणाऱ्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. नॅशनल, इंटरनॅशनल कॉल करणं सहज सोपं आहे. मात्र हा कॉल रेकॉर्ड कसा करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. कंपनीने याबाबत कोणतंही अधिकृत फीचर दिलेलं नाही. पण असं असलं तरी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करू शकता. यासाठी तुम्हाला एक अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर असून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचं नाव Call Recorder- Cube ACR आहे. या अ‍ॅपवरून तुम्ही प्रत्येक कॉल रेकॉर्ड करू शकता.

कॉल रेकॉर्ड करण्यासाठी काय करावं असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. यासाठी आम्ही तुम्हाला प्रत्येक स्टेप्स सांगणार आहोत. आयफोन वापरकर्त्यांना या अ‍ॅपचा वापर करता येणार नाही. मात्र इतर अ‍ॅप असून त्यासाठी पैसे मोजावे लागतील. चला जाणून घेऊयात अँड्राईड अ‍ॅपबाबत स्टेप बाय स्टेप..

बातमी वाचा- Mobile Tips: स्मार्टफोनच्या 'या' पार्ट्सची घ्या काळजी, अन्यथा महागडा फोन खराब झालाच समजा

व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत

-व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवर जावं लागेल
-गुगल स्टोरवरून Call Recorder- Cube ACR अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप फ्री आहे.
-अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर फोन अ‍ॅक्सेसिबिलिटीबाबत जा. तिथे सेटिंग्स सेक्शनमध्ये जा.
-यानंतर अ‍ॅप कनेक्टर इनेबल करा. त्यानंतर परमिशन मागितली जाईल तेव्हा Allow करा.
-इथे काही पर्याय दिले जातील, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप निवडा.
-आता व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा प्रत्येक कॉल रेकॉर्ड केला जाईल. रेकॉर्डिंग फोनमध्ये सेव्ह होईल.