गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' 5 गोष्टी

यामागचं कारण हैराण करणारं 

Updated: Oct 14, 2019, 10:43 AM IST
गुगलवर चुकूनही  सर्च करू नका 'या' 5 गोष्टी title=

मुंबई : गुगलचा वापर सर्वजण सर्च करण्यासाठी करतात. ज्याची माहिती कुठेच मिळणार नाही ती माहिती गुगलवर नक्की मिळेल असा नेटीझन्सला विश्वास आहे. पण तुम्ही सर्च करताना थोडा विचार करता का? की आपण गुगलवर नेमकं काय सर्च करतोय. कारण गुगलवर चुकूनही 'या' 5 गोष्टी अजिबात सर्च करू नका. 

ओळख 

गुगलवर कधीच स्वतःची ओळख सर्च करू नका. कारण गुगलजवळ तुमच्या सर्ट हिस्ट्रीचा सर्व डेटाबेस असतो. सतत ओळख सर्च केल्यामुळे ती माहिती लीक होण्याची शक्यता असते. कारण हॅकर्स याचीच वाट बघत असतात की, आपल्याला कोणती गोष्ट अगदी सहज मिळेल. 

संशयास्पद गोष्ट 

गुगलवर अनेकदा काहीजण अशी गोष्ट सर्च करतात ज्याचा त्यांना काही गरज नसते. पण फक्त बघण्यासाठी ती सर्च केली जाते. संशयास्पद गोष्ट असं काही सर्च करू नका की ज्यामुळे तुम्ही संकटात याल. कारण सायबर सेलची नजर अशा सर्चवर असते. यामुळे तुम्ही संकटात येऊ शकता. 

ई-मेल 

खासगी ई-मेल लॉगिनला गुगलवर सर्च करू नका. असं केल्यामुळे तुमचं अकाऊंट हॅक किंवा पासवर्ड लीक होऊ शकतो. अभ्यासावरून अशी माहिती समोर आली आहे की, जगभरात ई-मेल हॅक करण्याची घटना सर्वाधिक घडतात. सायबर सेलकडे याच्या अनेक तक्रारी आहेत. 

औषध 

जर तुम्ही एखाद्या आजाराची किंवा औषधाची माहिती गुगलवर सर्च करत असाल तर ते देखील तुम्हाला थांबवायला हवं. कारण सर्च केलेला डेटा थर्ड पार्टी ट्रान्सफर केला जातो. यामुळे सतत तुम्हाला त्या आजाराची आणि औषधाची माहिती देणारी जाहिरात दाखवली जाते. 

जाहिरात 

गुगलवर कधीही असुरक्षाशी संबंधीत असलेल्या गोष्टी सर्च करू नये. जर तुम्ही असं कराल तर त्याच्या जाहिराती तुम्हाला सतत येत राहतील. त्यावरून तुम्हाला हे कळेल की, कुणी तरी तुम्हाला इंटरनेटवर फॉलो करत आहे. जर तुम्हाला वाटतं की, तुम्हाला कोणतीही जाहिरात दिसू नये तर याची खबरदारी घ्या.