जीएसटी लागू होण्याआधी बुलेट झाली स्वस्त

देशातीस युवकांमध्ये लोकप्रिय बाईक कंपनी रॉयल एनफील्डने त्यांच्या अनेक मॉडल्‍सच्या किंमतींमध्ये घट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीकडून करण्यात आलेल्या एका व्यक्तव्यात म्हटलं की,  GST मुळे भारतातील बिझनेस बदलणार आहे. यामुळेच रॉयल इनफिल्ड आपल्या ग्राहकांना ऑफर देणार आहे.

Updated: Jun 23, 2017, 10:32 AM IST
जीएसटी लागू होण्याआधी बुलेट झाली स्वस्त title=

नवी दिल्ली : देशातीस युवकांमध्ये लोकप्रिय बाईक कंपनी रॉयल एनफील्डने त्यांच्या अनेक मॉडल्‍सच्या किंमतींमध्ये घट केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीकडून करण्यात आलेल्या एका व्यक्तव्यात म्हटलं की,  GST मुळे भारतातील बिझनेस बदलणार आहे. यामुळेच रॉयल इनफिल्ड आपल्या ग्राहकांना ऑफर देणार आहे.

याआधी बजाज ऑटोने आपल्या मॉडल्‍सच्या किंमतीत ४,५०० रुपयांची घट केली आहे. रॉयल एनफी‍ल्‍डचे प्रेसि‍डेंट रुद्रतेज सिंह यांनी म्हटलं की, आमचं असं म्हणणं आहे की, जीएसटीमुळे भारतात बिझनेस बदलेल. यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि ग्राहकांना फायदा होणार आहे. रॉयल एनफी‍ल्‍ड जीएसटीचा फायदा त्यांच्या ग्राहकांना देणार आहे. १६ जून २०१७ पासून खरेदीवर ऑन रोड किंमत बदलली आहे.

बुलेट 350 ची किंमत 1.13 लाख रुपये आहे. ऑन रोड किंमतीवर ३ ते ४  हजरांची घट केली आहे. ही किंमत ट्वीन स्पार्क आणि इलेक्ट्रा या दोनही मॉडलवर लागू होणार आहे. तर क्लासिक 350 ची किंमत 1.35 लाख रुपये आहे त्याच्या किंमतीतही 3 ते 4 हजारांची सूट दिली आहे. थंडरब्रिड ३५० ची किंमत १.६१ लाख रुपये आहे. त्याच्या किंमतीत ७००० हजारांची सूट दिली आहे.