९६ रूपयांत एवढा डेटा...विश्वासच बसणार नाही

'बीएसएनएल'चा ग्राहकांसाठी जबरदस्त प्लान 

Updated: Aug 29, 2019, 09:10 PM IST
९६ रूपयांत एवढा डेटा...विश्वासच बसणार नाही title=

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) बाजारात ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येत आहेत. सध्या सर्वच ठिकाणी ४जी उपलब्ध नाही. पण ज्याठिकाणी ४जी उपलब्ध आहे, त्याठिकाणी 'बीएसएनएल'ने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. आता ९६ रुपयांत ग्राहकांना दररोज १० जीबी डेटा वापरता येणार आहे.

महाराष्ट्रातील अकोला, भंडारा, बीड, जालना, उस्मानाबाद यांसारख्या भागात ४जी उपलब्ध आहे. या भागातील ग्राहक या प्लानचा फायदा घेऊ शकतात. या प्लानची वैधता २८ दिवसांपर्यंत आहे. यूजर्सला संपूर्ण प्लानमध्ये २८० जीबी डेटा मिळणार आहे.

याशिवाय, BSNLने २३६ रुपयांचा प्लानही लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दररोज १० जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस इतकी आहे. 

हा संपूर्ण डेटा प्लान आहे. यूजर्सला या प्लानमध्ये कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळणार नाही.