बीएसएनएलने पुलवामामध्ये सर्वातआधी ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचा मान पटकावला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात आली आहे. बीएसएनएलने पुलवामात ऑप्टीकल फायबर पोहोचवून ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचा पहिला मान  मिळवला आहे.

Updated: May 3, 2019, 03:39 PM IST
बीएसएनएलने पुलवामामध्ये सर्वातआधी ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचा मान पटकावला title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात आली आहे. बीएसएनएलने पुलवामात ऑप्टीकल फायबर पोहोचवून ब्रॉडबॅण्ड सेवा देण्याचा पहिला मान  मिळवला आहे.  कंपनीने 'भारत फाइबर' नावाने ही सेवा सुरू केली आहे. BSNLचे संचालक विवेक बंजल यांनी सांगितलं आहे की, ही पहिली फायबर सेवा आहे. ही सेवा आता प्रत्येक घरापर्यंत पोहचणार आहे. ही सेवा काश्मीरच्या कानाकोपऱ्यात पोहचवली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

'भारत फायबर सेवा' ऑप्टिकल फायबरवर आधारित आहे. तसेच ही सेवा ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचवली जाणार आहे. त्यामुळे त्यांना इंटरनेट सेवा आणि हायस्पीड इंटरनेट मिळणार आहे. सर्वसाधारण वातावरणातही किंवा प्रतिकूल हवामानाचा या सेवेवर परिणाम होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.  BSNLची १६० दूरसंचार जिल्ह्यात ७७७ रुपये मासिक शुल्क आहे. या सेवेचा किमान वेग 2 megabit प्रति (Mbps)सेकंद आहे.

बंजल म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू करण्याची आमची योजना आहे. जे लोक BSNL बरोबर व्यवसायाची संधी पाहत आहेत, त्यांनी स्थानिक  BSNL अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पाहिजे. आमचा कार्यसंघ नेटवर्क एकीकरण आणि कमाईच्या प्रक्रिया आणि सुविधाबद्दल माहिती देईल.  

या सेवेची सुरुवात CGM जम्मू-काश्मीर मंडळचे राणा कुमार सिंग यांच्या उपस्थितीत सुरु केली. दूरसंचार कंपनीचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.