'हिरो'च्या तीन धमाकेदार बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत

हिरोच्या एक्स सीरिजमध्ये (X-Series) १५० सीसीहून अधिक क्षमता असणाऱ्या बाईकचा समावेश केला जातो

Updated: May 2, 2019, 06:16 PM IST
'हिरो'च्या तीन धमाकेदार बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पनं (Hero Motocorp) एकाच वेळी तीन नव्या प्रीमियम ब्राईक लॉन्च करून उद्योगविश्वात एकच धम्माल उडवून दिलीय. एक्स सीरिजच्या तीन नव्या बाईकसहीत बाजारात आपली पकड आणखी घट्ट करण्याचा कंपनीचा मानस आहे. 

उल्लेखनीय म्हणजे, हिरोची एक्स सीरिज ही स्पोर्टी बाईकची सीरिज आहे. कंपनीनं बुधवारी लॉन्च केलेल्या बाईकमध्ये XPulse200, XPulse200T आणि Xtreme200S या तीन बाईकचा समावेश आहे. या बाईक तरुणांना आकर्षित करू शकतील, असा कंपनीला विश्वास आहे. 

हिरोच्या एक्स सीरिजमध्ये (X-Series) १५० सीसीहून अधिक क्षमता असणाऱ्या बाईकचा समावेश केला जातो. यापूर्वी कंपनीनं या सीरिजमध्ये  Xtreme 200R आणि XTREME SPORTS या बाईकद्वारे बाजारात धुमाकूळ घातलाय. 

काय आहे किंमत?

XPulse200, XPulse200T आणि Xtreme200S या बाईकची दिल्लीत एक्स-शोरुम किंमत ९४ हजार रुपयांपासून ते १.०५ लाख रुपयांपर्यंत आहे. 200 सीसी इंजनसहीत XPulse200T ची किंमत ९४ हजार रुपये, XPulse200 ची किंमत ९७ हजार रुपये आणि Xtrem200S ची किंमत ९८,५०० रुपये आहे. XPulse च्या फ्युएल इंजेक्शनच्या मॉडेलची किंमत १.०५ लाख रुपये आहे.