WhatsApp Communities : फेसबूक (Facebook) फाऊंडर मार्क झुकबर्ग (Mark Zuckerberg) ने व्हॉट्सएपवर कम्युनिटी (Communities) फीचर रोलआऊट करण्याची घोषणा केली आहे. हे फीचर आजपासून जगभरात रोलआऊट करण्यात आलं आहे. मात्र सर्वांना हे फीचर मिळण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.
व्हॉट्सएपच्या या कम्युनिटी फीचरबाबत कंपनीने या वर्षीच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती. कंपनी या फीचरला अनेक झोनमध्ये टेस्ट केली होती. या फीचरच्या माध्यमातून युझर्स ग्रुपमध्ये कनेक्ट होऊ शकतात. हे म्हणजे ग्रुपच्या आतमध्ये एक ग्रुप असण्याप्रमाणे फीचर आहे. म्हणजेच ग्रुपमध्ये तुम्ही वेगळा ग्रुप तयार करून निवडलेल्या युझर्सना मेसेज पाठवू शकता.
WhatsApp Communities फीचरच्या माध्यमातून विविध कंपनी, शाळा आणि कामाच्या ठिकाणी पालकांना टारगेट करता येणार आहे. युझर्स मोठ्या ग्रुपमध्येही अनेक ग्रुपमध्ये कनेक्ट होऊ शकतील. यासाठी कंपनी 15 देशांमध्ये 50 हून अधिक ऑर्गेनायझेशनसोबत काम करतेय.
हे फीचर वापरण्यासाठी युझर्स Android मोबाइलमध्ये चॅटच्या टॉपवर असलेल्या iOS मध्ये खालील बाजूस असलेल्या Communities टॅबवर क्लिक करू शकणार आहे. इथून Community ला नवा ग्रुप किंवा पूर्वी जोडलेल्या ग्रुपमधून सुरु करू शकता.
Welcome to Communities
Now admins can bring related groups together in one place to keep conversations organized.
Organized. Private. Connected pic.twitter.com/u7ZSmrs7Ys
— WhatsApp (@WhatsApp) November 3, 2022
Community मध्ये युझर्स सहजपणे ग्रुपमध्येही स्विच करू शकतात. एडमिन कम्युनिटीमधील सर्व सदस्यांना आवश्यक मेसेज पाठवू शकतो. कंपनीने दावा केलाय की, याच्या मदतीने युझर्सना हाई-लेवल सिक्योरिटी आणि प्रायवसी मिळू शकणार आहे. या फीचरमुळे युझर्सला वेगळे ग्रुप बनवण्याची किंवा वेगवेगळ्या ग्रुपला मेसेज पाठवण्याची गरज भासणार नाही.
कंपनीने असंही म्हटलंय की, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरणं सुरू ठेवतील. यामुळे कंपनीला युझर्सचा डेटाही मिळणार नाही. Communities व्यतिरिक्त कंपनीने आणखी तीन नवीन फिचर्स देखील जारी केलीयेत.
आता युझर्स 32 लोकांपर्यंत व्हिडिओ कॉलवर बोलू शकणार आहेत. याशिवाय ग्रुप साइज 512 मेंबर्सवरून 1024 करण्यात आलाय. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये इन-चॅट पोल देखील असणार आहे. या ग्रुपमध्ये सदस्य कोणत्याही मुद्द्यावर त्यांचं वोट देऊ शकतात.