Hummer Electric Cycle: सध्या तंत्रज्ञानाचं युग असून लोकांच्या गरजा पाहून नवनवे गॅझेट्स येत आहेत. ऑटोक्षेत्रातही गेल्या काही दिवसात बरेच बदल झाले आहेत. एकापेक्षा एक वरचढ इलेक्ट्रिक गाड्या लाँच झाल्या आहेत. त्यात आता इलेक्ट्रिक सायकलची भर पडली आहे. अनेक जण फिटनेस कायम राहावं यासाठी सायकलचा वापर करतात. त्यात इलेक्ट्रिक सायकल असेल तर कमी वेळेत निसर्गाचा फेरफटका मारणं आणखी सोपं होतं. आता इलेक्ट्रिक सायकल सेक्टरमध्ये हमर (Hummer) कंपनीने एन्ट्री मारली आहे. हमरने इलेक्ट्रिक एसयूव्हीनंतर इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. इ-सायकलच्या निर्मितीसाठी कंपनीने Recon कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या सायकलचे फीचर्स वाचून तुम्हीही खूश व्हाल.
इलेक्ट्रिक सायकलचं नाव जीएमसी हमर इलेक्ट्रिक ऑल-व्हिल ड्राईव्ह ई-बाइक आहे. या सायकलची किंमत 4000 डॉलर म्हणजेच 3.30 लाख रुपये ठेवली आहे. या सायकलची डिलिव्हरी डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सायकलला क्रूझ, ट्रॅक्शन आणि एड्रेनालाईन असे तीन मोड दिले आहेत. दोन हायड्रोलिक डिस्क ब्रेक, जाड टायर्स आणि एक फ्रंट सस्पेंशन फॉर्क दिलं आहे. यामुळे रायडर्सला सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता येईल.
PMV Electric: मिनी इलेक्ट्रिक कार 16 नोव्हेंबरला होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
ई-सायकल 45 किमी प्रतितास टॉप स्पीडने धावेल. यापेक्षा जास्त स्पीड हवा असल्यास बाइकसारखं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. यात 1 किलोवॅट बॅट दिला असून दोन हब मोटर्स दिले आहेत. जेव्हा दोन मोटर्स एकत्र चालतात तेव्हा 160 एनएम टॉर्क जनरेट करतात.