नवीन टेक्नोलॉजीसहीत एअरटेल 'जिओ'ची बाजी पलटून टाकणार?

भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एअरटेल' रिलायन्स जिओला मात देण्यासाठी सज्ज झालीय.

Updated: Jul 27, 2017, 08:54 AM IST
नवीन टेक्नोलॉजीसहीत एअरटेल 'जिओ'ची बाजी पलटून टाकणार? title=

मुंबई : भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'एअरटेल' रिलायन्स जिओला मात देण्यासाठी सज्ज झालीय.

यंदाच्या अखेरीपर्यंत देशभरात VoLTE सेवा सुरू करण्याची योजना एअरटेलनं आखलीय. यामुळे ग्राहकांना फोर जी टेक्नोलॉजी बेस्ट मोबाईल फोन कॉल करणं शक्य होणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, भारतात आत्तापर्यंत VoLTE ही टेक्नोलॉजी केवळ रिलायन्स जिओकडे उपलब्ध आहे. त्यामुळे, जिओच्या भरभराटीस चांगलीच मदतही झालीय. आता याच टेक्नोलॉजीसहीत एअरटेल जिओला मात देण्याच्या तयारीत आहे.

एअरटेलनं आत्तापर्यंत पाच-सहा शहरांमध्ये  VoLTE टेस्टिंग केलंय. या वर्षीच्या शेवटपर्यंत ही सेवा देशभरात सुरू होऊ शकेल. VoLTE या टेक्नोलॉजीमध्ये ग्राहकांना इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंगसाठी वेगवेगळे पैसे मोजावे लागत नाहीत.