भारीये हे! Apple बनवणार स्पायडर मॅन वॉच; आता स्मार्ट वॉच काढणार HD फोटो

Apple Watch हे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय स्मार्टवॉच आहे. अनेक कंपन्या त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. आता ऍपल रॉक करणार आहे. तो कॅमेरा घड्याळातच बसवणार आहे.

Updated: Jun 2, 2022, 08:25 AM IST
भारीये हे! Apple बनवणार स्पायडर मॅन वॉच; आता स्मार्ट वॉच काढणार HD फोटो title=

मुंबई : ऍपल वॉच हे बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय स्मार्टवॉचपैकी एक आहे आणि त्यांनी वेअरेबलसाठी एक बार सेट केला आहे. काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, 2022 च्या पहिल्या तिमाहीत ऍपलची शेअर बाजारात 36 टक्के हिस्सेदारी राहिली आहे. आता iMore प्रकाशनाने पाहिलेले पेटंट सूचित करते की, Apple Watch भविष्यात बिल्ट इन कॅमेरासह येऊ शकते. म्हणजेच कॅमेरा घड्याळाच्या आतच लपलेला असेल आणि हात हलवताच फोटो क्लिक करेल.

हे पेटंट युनायटेड स्टेट्स पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस (USPTO) येथे प्रकाशित करण्यात आले. कॅमेरा लेन्स डिजिटल क्राउन बटणाच्या आत ठेवण्याचे Apple चे ध्येय आहे. कॅमेरा डिव्हाइसच्या उजव्या बाजूला असेल. कॅमेरा लेन्सला एपर्चरमध्ये किंवा डायलच्या एपर्चरमध्ये इंटिग्रेटेड केले जाऊ शकते. जेणेकरून ऑब्जेक्टवर लक्ष केंद्रित केले जाईल.

डाव्या हातात घड्याळ 

जे लोक त्यांच्या उजव्या हातावर घड्याळ घालण्यास प्राधान्य देतात, त्यांच्या कॅमेरा स्वतःच्या बाजूने असेल. म्हणून, वापरकर्त्याने डिव्हाइसला डाव्या हातात परिधान करणे आवश्यक आहे. जेणेकरुन डिजिटल क्राउनच्या आतील लेन्स उलट दिशेने असेल. युजर्सचा हा प्रश्न ऍपल कसे सोडवतो हे पाहणं आता महत्वाचं ठरेल? हे फीचर लगेचच बाजारात येईल असे नाही.