Apple, Microsoft आणि बर्कशायर Hathway कंपन्या सेकंदाला कमवतात इतके रुपये, जाणून घ्या

Apple, Google आणि Microsoft सारख्या टेक दिग्गजांना दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का दर सेकंदाला किती नफा कमावतात? चला तर जाणून घेऊयात

Updated: Nov 25, 2022, 04:58 PM IST
Apple, Microsoft आणि बर्कशायर Hathway कंपन्या सेकंदाला कमवतात इतके रुपये, जाणून घ्या title=

Apple Microsoft And Birkshire Hathway Earn Every Seconds: अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि बर्कशायर हाथवे कंपन्यांबाबत संपूर्ण जगात चर्चा आहे. गेल्या काही वर्षात या कंपन्यांनी प्रत्येक देशात आपली पालंमुलं रुजवली आहेत. या कंपन्यांचं प्रॉफीट पाहून तुमचे डोळे विस्फारतील. अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट आणि वॉरेन बफेट यांची बर्कशायर हाथवे कंपनी सेकंदाला किती रुपये कमावतात? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. अ‍ॅपल ही जगातील सर्वात जास्त फायद्यात असलेली कंपनी आहे. अ‍ॅपल कंपनी सेकंदाला 1820 डॉलर म्हणजेच 1.48 लाखांची कमाई करते. तर दिवसाला 157 मिलियन डॉलर्स म्हणजेच 1282 कोटी रुपयांची कमाई करते. अ‍ॅपलनंतर मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट आणि वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर या कंपन्यांचा क्रमांक लागतो. या कंपन्याही सेकंदाला हजार डॉलरपेक्षा जास्त कमवतात.

अ‍ॅपलनंतर या कंपन्यांची कमाई

मायक्रोसॉफ्ट कंपनी कमाईच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मायक्रोसॉफ्ट सेकंदाला 1404 डॉलर्सची म्हणजेच 1.14 लाखांची कमाई करते. तर बर्कशायर हाथवे कंपनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही कंपनी सेकंदाला 1348 डॉलर्सची म्हणजेच 1.10 लाखांची कमाई करते. तर अल्फाबेट ही कंपनी या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ही कंपनी प्रत्येक सेकंदाला 1277 डॉलर्सची करते. पाचव्या स्थानावर मेटा असून सेकंदाला 924 डॉलर्सची कमाई करते. 

बातमी वाचा- Loan Moratorium: कर्जाचा हप्ता भरताना अडचण होत आहे! बँकेकडे असा मागाल अवधी

अमेरिकन व्यक्तीची सरासरी कमाई आणि कंपन्या

एका अहवालानुसार असं दिसून आलं आहे की, अमेरिकेतील कामगार त्यांच्या आयुष्यात सरासरी 1.7 मिलियन डॉलर्सची कमाई करतो, असा अंदाज आहे. म्हणजेच प्रत्येक कामगार कंपन्यांच्या एका तासाच्या कमाईपेक्षा सरासरी कमी पैसे कमावतो. अमेरिकेत सरासरी वार्षिक पगार 74,738 डॉलर्स किंवा 1,433.33 डॉलर्स प्रति आठवडा आहे. याचा अर्थ अॅपल कंपनी एका आठवड्यात सरासरी अमेरिकन कर्मचाऱ्यापेक्षा प्रति सेकंद 387 डॉलर्स म्हणजेच 27.01 टक्के अधिक कमवते.

बातमी वाचा- तुम्ही एकापेक्षा जास्त Credit Card वापरता! याबाबत जाणून घ्या अन्यथा नुकसान झालंच समजा

एका अहवालानुसार मेटा प्लॅटफॉर्म (पूर्वीचे Facebook) वार्षिक 10.66 बिलियन डॉलर्स नफ्यासह मागे आहे.  ऑनलाइन रिटेल कंपनी Amazon ने नफ्यात चांगली झेप घेतली असून 2020 पेक्षा 2021 मध्ये 9.74 अब्ज डॉलर्स अधिक कमावले. उबेर टेक्नोलॉजी या कंपनीने 2021 मध्ये 6.8 बिलियन डॉलर्सचे नुकसान सहन केले आहे. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला 215 डॉलर्स इतके नुकसान झाले आहे.