आयफोनच्या या नवीन मॉडेलचे सर्वप्रथम भारतात होणार लाँच !

 गेल्या वर्षी लाँच झालेला आयफोन SE पुन्हा एकदा नव्या स्वरूपात बाजारात येण्याच्या तयारीत आहे. परंतु, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की, हा नवा आयफोन SE हा सगळ्यात आधी भारतात लाँच करण्यात येईल. हा स्मार्टफोन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात येईल. वृत्तानुसार भारत आईफोन SE चं पहिलं मार्केट असेल. या फोनचे मॅनिफॅक्चर विस्ट्रॉनने केले आहे. २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात  हा स्मार्टफोनभारतात येण्यास सुरुवात होईल.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 8, 2017, 01:01 PM IST
आयफोनच्या या नवीन मॉडेलचे सर्वप्रथम भारतात होणार लाँच ! title=

मुंबई: 

गेल्या वर्षी लाँच झालेला आयफोन SE पुन्हा एकदा नव्या स्वरूपात बाजारात येण्याच्या तयारीत आहे. परंतु, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की, हा नवा आयफोन SE हा सगळ्यात आधी भारतात लाँच करण्यात येईल. हा स्मार्टफोन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात येईल. वृत्तानुसार भारत आईफोन SE चं पहिलं मार्केट असेल. या फोनचे मॅनिफॅक्चर विस्ट्रॉनने केले आहे. २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात  हा स्मार्टफोनभारतात येण्यास सुरुवात होईल. 

आयफोन SE चे नवीन व्हर्जन: 
फोकस ताईवान च्या वृत्तानुसार आयफोन SE च्या नव्या व्हर्जनचे भारतात लाँच करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे पुढील पाच वर्षात अँपल भारतात आपले शेयर दुप्पट करणार आहे. लाँचिंगनंतर आयफोन SE अपग्रेड झाला नव्हता. 

लाँचिंगसाठी सरकारशी चर्चा:
अलीकडेच मार्चमध्ये कंपनीने अधिक स्टोरेज असणारा वेरिएंट लाँच केला होता. वृत्तानुसार कंपनी पुढील पाच वर्षात आपली प्रॉडक्टिव्हिटी दोन ते तीनपट वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारशी चर्चा करत आहे.