भारतापेक्षा दुबईत iPhone 15 स्वस्त; 'मेक इन इंडिया' असूनही किंमतीत 46 हजारांचा फरक

iPhone 15 series: अॅपलने आयफोन 15ची सिरीज लाँच करण्यात आली आहे. पण मेक इन इंडिया असूनही भारतात आयफोनची किंमत जास्त आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 13, 2023, 11:12 AM IST
भारतापेक्षा दुबईत iPhone 15 स्वस्त; 'मेक इन इंडिया' असूनही किंमतीत 46 हजारांचा फरक title=
Apple iPhone 15 Series Price In India Vs dubai

iPhone 15 Series: अॅपलच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणांची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. अॅपल कंपनीने 12 सप्टेंबररोजी आयफोन 15ची सीरीज लाँच करण्यात आली आहे. भारतातही आयफोन 15 लाँच झाला असून या सीरीजमध्ये चार मॉडल लाँच करण्यात आले आहेत. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max हे चार मॉडेल लाँच केले आहेत. आयफोन 15ची निर्मिती भारतात करण्यात आली आहे, अशा चर्चा होत्या. त्यामुळं भारतात आयफोन 15ची किंमतीत थोडी घट होण्याची शक्यता होती. मात्र, असे काही होताना दिसत नाहीये. भारतात आयफोनची किंमत इतर देशांच्या तुलनेने जास्त आहे. 

आयफोन 15 भारतात बनवण्यात आला आहे. मात्र, भारतापेक्षा दुबईत कमी किंमतीत आयफोनची विक्री होत आहे. iPhone 15 Pro Max ची भारतीय किंमत दुबईपेक्षा सुमारे 46 हजार रुपयांनी जास्त आहे. अशा परिस्थित मग मेक इन इंडियाचा फायदा काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ट्विटर (एक्स) युजर्सने काही सवाल उपस्थित केला आहे. जर भारतात तयार होऊनही आयफोन महाग आहे तर मग काय फायदा?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

आयफोन 15 सीरीज भारतात बनवण्यात आलेली असली तरी त्याचा ग्राहकांना काहीच फायदा होताना दिसत नाहीये. कारण भारत सरकारकडून आयफोनवर अनेक प्रकारचे कर लादले जातात. त्याचबरोबर आयफोनची किंमतीवर जीएसटी टॅक्सदेखील लावला जातो. त्यामुळं भारतात आयफोन-15 महाग आहे. तर, ज्या देशात आयफोनवर कमी कर लादला जातो तिथे आयफोनची किंमत कमी असते. 

मेक इन इंडियाचा फायदा

भारतात आयफोन-15 च्या निर्मितीमुळं भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. भारतात आयफोनला एक लग्झरी गुड्स म्हणून पाहिलं जातं. त्यामुळं यावर जास्त कर आकारला जातो. मात्र भारतात आयफोनच्या निर्मितीमुळे देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नवीन नोकऱ्या आणि कर लाभ मिळतात.

भारतात आयफोन 15ची किंमत काय?

भारतात 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेज व्हेरिएंटसाठी iPhone 15 Pro ची किंमत अनुक्रमे रु 1,34,900, रु 1,44,900, रु 1,64,900 आणि रु 1,84,900 आहे. 

दुबईत आयफोनची किंमत 

दुबईत आयफोन 15 प्रोची किंमत 97,000 रुपयांपासून सुरू होते. तर, आयफोन 15 प्रो मॅक्सची किंमत 1,15,000 पर्यंत आहे. 15 प्रो मॅक्सचे बेस व्हिरेयंटची किंमत भारतापेक्षा दुबईत कमी आहे, असं ट्विट एका युजर्सने केले आहे.