एअरटेलकडून आले १ लाख ८६ हजाराचे बिल

सर्वसाधारण माणसाचे महिन्याचे मोबाईल बिल साधरण पाचशे ते हजार रुपयांपर्यंत येते. बिझनेसमन माणसाचे फोन बिलही लाखाच्या घरात क्वचितच जात असावे. पण एअरटेल कंपनीकडून आलेले बिल पाहून एका ग्राहकाला हार्ट अटॅक येण्याचेच बाकी राहिले होते.  कारण त्यांच्या महिन्याच्या कॉलिंगचे दहा-वीस-पन्नास हजार नाही तर तब्बल १ लाख ८६ हजार ५५३ रुपयांचे बिल आले. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 14, 2017, 06:54 PM IST
एअरटेलकडून आले १ लाख ८६ हजाराचे बिल title=

नवी दिल्ली : सर्वसाधारण माणसाचे महिन्याचे मोबाईल बिल साधरण पाचशे ते हजार रुपयांपर्यंत येते. बिझनेसमन माणसाचे फोन बिलही लाखाच्या घरात क्वचितच जात असावे. पण एअरटेल कंपनीकडून आलेले बिल पाहून एका ग्राहकाला हार्ट अटॅक येण्याचेच बाकी राहिले होते.  कारण त्यांच्या महिन्याच्या कॉलिंगचे दहा-वीस-पन्नास हजार नाही तर तब्बल १ लाख ८६ हजार ५५३ रुपयांचे बिल आले. 
 नितीन सेठी यांना हा अनुभव आला असून ते दिल्लीतील एका कंपनीत व्हाईस प्रेजिडेंट म्हणून काम करीत आहेत. इंडिया टुडे वेबसाईटच्या वृत्तानुसार नितीन सेठी यांचं हे बिल 8 जुलै 2017 रोजी बनविण्यात आले आहे. ग्राहकाने १ लाख ८६ हजार ५५३ रुपयांची सेवा वापरली, तर याची क्रेडिट लिमिट १४ हजार रुपयांपर्यंत आहे, असं बिलामध्ये म्हटलं होतं. हे बिल पाहताच त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनस्तापात अधिकच वाढ झाली. दरम्यान ही तांत्रिक चुक असल्याचे कंपनीने मान्य केले पण पुढे काहीच कारवाई होत नव्हती. 
 या सगळ्याला कंटाळलेल्या नितीन यांनी सोशल मीडियावर आपली कैफीयत मांडली. र एअरटेकडून याची दखल घेण्यात आली व तांत्रिक कारणामुळे ही चूक झाल्याचं कंपनीने मान्य केलं आणि दुरुस्त बिल दिलं. याचे निराकरण करण्यासाठी कोर्टाची पायरी चढाण्याचा नितीन यांनी विचार केला होता पण कंपनीने प्रकरण वेळीच शांत केल्याने त्याची गरज आता लागणार नसल्याचे नितीन सेठी यांनी सांगितले.