Google ने Play store वरुन डिलीट केले हे 7 धोकादायक App, तुम्हीही लगेच डिलीट करा

तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 7 धोकादायक अॅप्स असतील तर ते लगेच काढून टाका. अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

Updated: Nov 16, 2021, 02:40 PM IST
Google ने Play store वरुन डिलीट केले हे 7 धोकादायक App, तुम्हीही लगेच डिलीट करा title=

मुंबई : Google ने Play Store वरून 7 धोकादायक अॅप काढून टाकले आहेत. Kasperskey येथील मालवेअर विश्लेषक ततयाना शिशकोवा (Tatyana Shishkova) यांनी या सर्व 7 अॅप्समध्ये मालवेअर ओळखले होते. त्यांनी सांगितले की हे धोकादायक अॅप  'ट्रोजन' (Trojan) जोकर सारख्या मालवेअरने संक्रमित आहे. अलीकडे Squid Game वापरकर्त्यांना अशाच प्रकारच्या मालवेअर हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. (Google Delete this 7 apps from Play Store)

हे धोकादायक अॅप फोनमधून ताबडतोब डिलीट करा

Google ने हे अॅप्स Google Play Store वरून काढून टाकले आहेत. अशा परिस्थितीत तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 7 धोकादायक अॅप्स असतील तर ते लगेच काढून टाका. अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. वास्तविक, हे धोकादायक अॅप्स आतापर्यंत कोटींच्या संख्येने डाऊनलोड झाले आहेत. अशा परिस्थितीत, सर्व वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये असे धोकादायक अॅप्स आहेत की नाही हे तपासले पाहिजे. तसे असल्यास, त्यांना त्वरित फोनवरून काढून टाका.

हे आहेत ते 7 धोकादायक अॅप्स

Now QRcode Scan - 10,000+ इंस्टॉल
EmojiOne Keyboard - 50,000 हून अधिक इंस्टॉल
Battery Charging Animations Battery Wallpaper - 1,000 हून अधिक इंस्टॉल
Dazzling Keyboar - 10 इंस्टॉल
Volume Booster Louder Sound Equalizer - 100 इंस्टॉल
Super Hero-Effect - 5,000 इंस्टॉल
Classic Emoji Keyboard - 5,000 इंस्टॉल

ऑनलाइन सेवा काळजीपूर्वक वापरा

Google ने प्रतिबंधित केलेल्या 7 धोकादायक अॅप्सची सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे ते मालवेअर हल्ल्यांद्वारे बनावट सदस्यता आणि अॅप-मधील खरेदी यासारख्या बेकायदेशीर फसवणूक ऑफर करतात. अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांनी या लिंक्स आणि अनावश्यक खरेदीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सध्याच्या काळात लोक ऑनलाइनकडे वळत आहेत. अशा स्थितीत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे.