Maruti Suzuki Alto Launch Date: मारुति सुझुकीने नुकतील अपडेटेड ब्रेझा लाँच केली आहे. त्यानंतर लगेचच ग्रँड विटारा सादर केली आणि ही गाडी सप्टेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. एका पाठोपाठ दोन गाड्या बाजारात असताना कंपनी ऑगस्टमध्ये अपडेटेड अल्टो लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, मारुति सुझुकी 18 ऑगस्टला अल्टो लाँच करण्याची शक्यता आहे. चला तर नव्या मारुति सुझुकी अल्टोबाबत जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर लीक झालेल्या फोटोंवरून तरी नवीन अल्टोचं डिझाईन अपडेट केल्याचं दिसत आहे. नव्या अल्टोमध्ये सेलेरियोची झलक दिसते. 2022 मारुति सुझुकी अल्टोत अपडेटेड पावरट्रेन असण्याची अपेक्षा आहे. अपडेटेड एस-प्रेस्सोसारखी आगामी अल्टोमध्ये K10C 1.0 लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. नवं 1.0 लिटर इंजिन 66 बीएचपी आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तर जुनी 0.8 लिटर युनिट 47 बीएचपी आणि 69 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटीचा पर्याय मिळू शकतो. त्याचबरोबर गाडी सीएनजी वर्जनमध्ये सादर केली जाऊ शकते.
सुरक्षेच्या दृष्टीने या गाडीत दोन एअरबॅग्स मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 796 सीसी इंजिनही असेल, असं सांगण्यात येत आहे. गाडीमध्ये ईबीडीसह एबीएस, पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट एंकर, सीटबेल्ट रिमांडर, हायस्पीड अलर्ट आमि ईएससी दिलं जाण्याची शक्यता आहे.