Mercedes-AMG S 63 कूपे भारतात लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

...

Updated: Jun 19, 2018, 12:23 PM IST
Mercedes-AMG S 63 कूपे भारतात लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स title=
Image: www.mercedes-benz.co.in

नवी दिल्ली : लग्जरीयस कार बनवणाऱ्या मर्सिडीज कंपनीने ई क्लास रेंजची टॉप मॉडेल लॉन्च केल्यानंतर आता नवी आलिशान कार लॉन्च करण्यात आली आहे. मर्सिडीज कंपनीने भारतीय बाजारात Mercedes-AMG S 63 कूपे लॉन्च केली आहे. पहायला ही कार खूपच आलिशान, स्टायलिश वाटत आहे. चला तर मग पाहूयात या आलिशान कारची किंमत आणि त्याचे फिचर्स काय आहेत.

Mercedes-AMG S 63 चे फिचर्स 

या गाडीत असलेलं इंजिन 612 हॉर्सपावरची ताकद आणि 900 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. इंजिनला 9 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे. 0 ते 100 किमी प्रति तास हा स्पीड घेण्यासाठी या कारला केवळ 3.5 सेकंद लागतात. या गाडीचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रति तास आहे.

19 इंचाचे अलॉय व्हिल्स

Mercedes-AMG S 63 कूपे कारमध्ये नव्या ग्रिल्स आणि मोठे एअर इनटेकर्स लावण्यात आले आहेत. तसेच कारला 19 इंचाचे अलॉय व्हिल्स ही देण्यात आले आहेत. या कारच्या लिमिटेड युनिट्स भारतात विक्री केल्या जाणार आहेत.


Image: www.mercedes-benz.co.in

असं आहे कारचं इंटेरियर 

या कारमध्ये लेदर, फ्रँटमध्ये एएमजी बॅज आणि मागील सिटवर बॅकरेस्ट्स आहेत. 12.3 इंच टीएफटी वाइडस्क्रीन कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. 

कारची किंमत 

मर्सिडीजच्या Mercedes-AMG S 63 कूपे या कारची किंमत 2.55 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. या कारमध्ये 4.0 लिटर Twin-Turbo, V8 इंजिन देण्यात आलं आहे.