wardha

८० रूपयांत भिंत? मात्र, अधिकाऱ्यांनी ते शक्य केलंय!

सरकारी अधिकारी किती निगरगट्ट असू शकतात, याचा जिवंत अनुभव वर्ध्यातील एका शेतक-याला आलाय... मुसळधार पावसामुळं या शेतक-याच्या घराची भिंतच वाहून गेली. सरकारकडून त्यासाठी नुकसान भरपाईही मिळाली... किती? ८० रूपये फक्त...

Oct 23, 2013, 08:55 AM IST

वर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!

ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.

Sep 11, 2013, 01:07 PM IST

मुलीसह आईची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

वर्धा इथल्या मानस मंदिर परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेनं आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. आपल्याच घराच्या मागील विहिरीत या मायलेकींचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Sep 8, 2013, 03:25 PM IST

वर्धात वणा नदीत बोट बुडाली

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये वणा नदीत बोट उलटल्यानं झाल्यानं अपघातामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळालीय. तर पाच जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Aug 9, 2013, 07:50 AM IST

बापूंच्या आठवणी जपणार कोण?

आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय.

Oct 2, 2012, 11:39 AM IST

वर्ध्यात प्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा

वर्धा जिल्ह्यातील आंजी गावात अनुसुया माता मंदिरातमहाप्रसादातून १८५ भाव़िकांना विषबाधा झालीय. वार्षिक कार्यक्रमाच्या निमीत्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेवणातील बासुंदी मधून विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांची स्थिती सध्या स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Apr 14, 2012, 02:07 PM IST

वर्ध्यात 'आधार'चे काम 'धारदार'

'आधार' नोंदणीत वर्धा जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जिल्ह्यातील 52 टक्के नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी करून घेतली. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सहा लाख 46 हजार 115 जणांची नोंदणी झाली आहे.

Oct 2, 2011, 02:34 PM IST