usa

डॉ. देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेत कपडे उतरवून चौकशी

भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. शिवाय अट्टल गुन्हेगार असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत भारताने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या शिष्टमंडळास भेट देण्याचे भारताने टाळले आहे.

Dec 17, 2013, 12:59 PM IST

हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्बची बोंबाबोंब

हारवर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्ब ठेवल्याची बोंबाबोंब होताच पूर्ण विद्यापीठ खाली करण्यात आले. तसेच विद्यापीठातील होणारी परीक्षाही रद्द करण्यात आली. बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समजतात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, ही अफवा असल्याचे चौकशीनंतर समजले.

Dec 17, 2013, 12:02 PM IST

धास्तावलेल्या सीरियाची संयुक्त राष्ट्राकडे मदतीची याचना

अमेरिकेनं असद सरकारविरुद्ध सीरीयावर हल्ला करण्याचा बेत आखल्याचं आता स्पष्ट झालंय. यामुळेच धास्तावलेल्या सीरियानं संयुक्त राष्ट्राकडे या संभावित हल्ल्याला रोखण्याची विनंती केलीय.

Sep 3, 2013, 09:54 AM IST

चीनचा वेगवान सुपरकॉम्प्युटर

भारताचा महासंगणक. जगात नाव कमावून होता. आता तर या स्पर्धेत चीनही उतरलाय. चीनने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक (सुपरकॉम्प्युटर) बनविण्याचा मान पटकावलाय.

Jun 18, 2013, 02:13 PM IST

गावात शेण उचलणारा झाला ११९९ कोटींचा मालक

जगात असे लोक आहेत की स्वप्नातही ऐश आरामाचे जीवनाचे स्वप्न पाहात नाहीत. मात्र, कधी कधी असा चमत्कार घडतो की, त्यावर विश्वास ठेवणेही शक्य होत नाही. अशीच एक अजब घटना घडली आहे. सर्वधासाधण जीवनजगणाऱ्याला पैशाची लॉटरीच लागलीय. तो एका रात्रीत कुबेर झालाय. ही वास्तवातील घटना आहे. गावात शेण उचलणारा ठरला आहे, ११९९ करोड़ रुपयांचा मालक.

Feb 13, 2013, 04:30 PM IST

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा

अमेरिकेच्या ईशान्य भागात हिमवादळाच्या तडाख्यात ९ जणांना प्राण गमवावा लागला आहे. या भीषण वादळाने सुमारे ५० लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार झाला आहे.

Feb 11, 2013, 05:14 PM IST

अमेरिकेला वाचवण्याठी ओबामाना हवीय भारतीयांची मदत

मिट रोम्नी यांना पराभूत करून दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झालेल्या बराक ओबामा यांना भारतीय महिलांची मदत हवीय. अमेरिकेला खालावलेल्या आर्थिक परिस्थितून बाहेर काढण्यासाठी ओबामांना मदतीची गजर आहे.

Nov 13, 2012, 03:32 PM IST

‘सॅण्डी’ हा अमेरिकेला अल्लाचाच तडाखा -मौलवी

‘सॅण्डी’ या भयंकर वादळाचा अमेरिकेला बसलेल्या तडाख्यानंतर इजिप्तमधील मुल्ला मौलवींचे मत आहे. ‘सॅण्डी’ हा अमेरिकेला ‘अल्ला’ने दिलेला तडाखा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Nov 3, 2012, 11:49 AM IST

अमेरिकेत आगीत ३०० कैदी होरपळले

मध्य अमेरिकेतील हो्न्डुरासमध्ये कारागृहाला लागलेल्या आगीत 300 कैद्यांचा जळून मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक अग्निशामक विभागाने दिली.

Feb 16, 2012, 11:43 AM IST

अमेरिकन सैन्य २०१४नंतरही अफगाणिस्तानातच?

२०१४ या वर्षापर्यंतच सैन्य ठेवण्याची मर्यादा देण्यात आली असली, तरी त्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैनिक तैनात असण्याची शक्यता अमेरिकन सैन्याच्या एका प्रमुख लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे.

Dec 21, 2011, 05:36 PM IST

अमेरिकेच्या हल्ल्यात सात दहशतवादी ठार

पाकिस्तानच्या वायव्य सीमेवर असलेल्या अदिवासी भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात, सात संशयित दहशतवादी ठार झालेत.

Nov 15, 2011, 10:36 AM IST

पूर्व अमेरिकेवर हिमसंकट !

पूर्व अमेरिकेत तुफान बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बर्फवृष्टीमुळे जवळजवळ २० लाख घरांतली वीज गायब झाली आहे. बर्फवृष्टीमुळे विमानसेवेवरही परिणाम झालेला आहे. आतापर्यंत जवळपास एक हजार विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.

Oct 31, 2011, 12:09 PM IST