पाकिस्तानच्या वायव्य सीमेवर असलेल्या अदिवासी भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात, सात संशयित दहशतवादी ठार झालेत. हा हल्ला आज सकाळी करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अफगाणिस्तान सीमेवरील वझिरीस्तान प्रांतातील एका घरावर अमेरिकेने हा हल्ला केला. या हल्ल्यात १६ दहशतवादी ठार झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
तालिबान आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. या आदिवासीबहुल भागात दहशतवाद्यांचा वावर आहे. अमेरिकेने या वर्षभरात १०० पेक्षा जास्त हल्ले केले आहेत.