www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्ब ठेवल्याची बोंबाबोंब होताच पूर्ण विद्यापीठ खाली करण्यात आले. तसेच विद्यापीठातील होणारी परीक्षाही रद्द करण्यात आली. बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समजतात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, ही अफवा असल्याचे चौकशीनंतर समजले.
अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्बचे वृत्त समजताच आपत्ती व्यवस्थापनने बॉम्ब निकामी करण्यासाठी हालचाल सुरू केली. सुरक्षेसाठी विद्यापीठीत खाली करण्यात आले. तसचे परीक्षाही रद्द करण्यात आली.
हार्वर्ड विद्यापाठीच्या संकेतस्थळावर एक संदेश प्रसिद्ध करण्यात आला. या संदेशात म्हटलेय, विद्यापीठाच्या चारही बाजुला बॉम्ब ठेवले आहेत. पोलिसांना तात्काळ माहिती मिळताच पोलीस तात्काल विद्यापाठ ठिकाणी पोहोचलेत. त्यानंतर विद्यापाठ खाली करण्यात आले. दरम्यान, हार्वर्ड विद्यापीठाने स्पष्ट केले की, आमचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे. याबाबत अधिक माहिती मिळाली की मीडियाला ती देऊ.
दुपारी २.४४ वाजता विद्यापाठाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली, बॉम्ब तपासाची सुरूवात झालेय. सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेय. सर्व चारही जागा आता खुल्या करण्यात आल्यात. दरम्यान, बॉम्बची काहीही माहिती मिळाली नाही. ही अफवा असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, सकाळी नऊ वाजता विद्य़ार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना ईमेल आणि एसएमएस पाठवून परिसर खाली करण्यास सांगण्यात आले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.