www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
भारताचा महासंगणक. जगात नाव कमावून होता. आता तर या स्पर्धेत चीनही उतरलाय. चीनने अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक (सुपरकॉम्प्युटर) बनविण्याचा मान पटकावलाय.
चीनचा हा सुपर संगणक एका सेकंदात ३३.८६ हजार करोड़च्या गतीपेक्षा जास्त वेगाने [क्वाड्रिलियन] काम करतो. सोमवारी एका सर्वेक्षणात ते स्पष्ट झाले आहे. या संगणकाने अमेरिकेच्या टायटन सुपर संगणकाला मागे टाकले आहे.
चीनमधील राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने हे यश मिळविले आहे. तिआन्हे-२ हा या विद्यापीठाने तयार केलेला सुपरकॉम्प्युटर अमेरिकेच्या उर्जा मंत्रालयाने तयार केलेल्या टायटन या सुपरकॉंप्युटरच्या दुप्पट वेगाने काम करू शकत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जगातील ५०० सर्वाधिक वेगवान सुपरकॉम्प्युटर्सची यादी या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये तिआन्हे-२ ची क्षमता एका सेकंदाला ३३.८६ पेटाफ्लॉप्स इतकी आहे. म्हणजेच तिआन्हे-२ हा एका सेकंदात ३३.८६० लाख कोटी कॅल्क्युसलेशन्स करू शकत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हवामान व्यवस्थेवरील अभ्यास, अथवा आण्विक प्रक्रियेवरील नियंत्रण अशा अत्यंत जटील प्रक्रियांसाठी सुपरकॉम्प्युटर्स वापरले जातात. याआधी, तिआन्हे-१ए या चीनच्या सुपरकॉम्युजकटरलाही २०१० मध्ये अग्रस्थान मिळाले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.