tsunami

भूकंप, त्सुनामीचा धोका टाळण्यासाठी नवे उपकरण 'ब्रिंको'

भूकंप किंवा त्सुनामी आल्यास चेतावणी देणारे नवीन उपकरण 'ब्रिंको' वैज्ञानिकांनी तयार केले आहे. या उपकरणाचा आकार छोटा असल्यामुळे ते आपल्या घरी सहज राहू शकेल. स्थानिक क्षेत्रात भूकंप किंवा त्सुनामी आल्यास त्याची चेतावणी हे 'ब्रिंको' देऊ शकेल. 

Jul 18, 2015, 04:13 PM IST

जपानमध्ये भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा

जपानच्या उत्तर किनाऱ्यावर आज सकाळी शक्तीशाली भूकंप झाला. मात्र, या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, छोट्याप्रमाणात त्सुनामीचा तडाखा किनारी भागात बसल्याचे सांगण्यात येत आहे.

Feb 17, 2015, 03:19 PM IST

नसबंदीनंतर पुन्हा बनली ती आई

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर असलेल्या मड्मेडू या गावात शांती आणि तिचा पती स्वामीनाथन तीन मुलींसह राहतात. पण या तीन मुलींचा जन्म एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या तीन मुलींच्या जन्मापूर्वीच शांतीने आपली नसबंदी केली होती.

Dec 26, 2013, 04:25 PM IST

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, त्सुनामी लाटा धडकल्या

ईशान्य जपानला आज ७.३ रिश्टर स्केलच्या भूंकपाने जोरदार तडाखा दिला. या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता असल्याने जपानमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Dec 7, 2012, 02:37 PM IST

भूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता

जागतिक वेळेनुसार ९.३० वाजता इंडोनेशियातील बांडा असेह प्रांतात त्सुनामी येऊ शकते, अशी शक्यता वॉर्निंग सेंटरने वर्तवली आहे. इंडोनेशियाच्या या प्रांतात बहुतेकवेळा भूकंपाचे हादरे बसत असतात. २००४ साली झालेल्या भूकंपामध्ये या प्रांतातील १,७०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.

Apr 11, 2012, 03:42 PM IST

जपानमध्ये पुन्हा भूकंप

वर्षाचा पहिला दिवस जगभराने आनंदाने साजरा केला आसला तरी, जपानमध्ये मात्र पुन्हा भुकंपाने नववर्षाचं आगमन झालं आहे. टोकयो आणि आसपासच्या परिसरात आज भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल एवढी होती.

Jan 1, 2012, 12:37 PM IST