जिजाऊंच्या पुण्यतिथीला करु स्मरण; राजमाता जिजामाता यांचे गुण असणारी मुलींची नावे

Baby Girl Names : राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलींची काही खास नावे आणि अर्थ. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 30, 2024, 10:38 AM IST
जिजाऊंच्या पुण्यतिथीला करु स्मरण; राजमाता जिजामाता यांचे गुण असणारी मुलींची नावे  title=

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाबाई यांची आज 30 जून रोजी तिथीनुसार पुण्यतिथी. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी अखेरचा श्वास घेतला होता.

राजमाता जिजाऊ यांच्या कर्तृत्वाप्रमाणे तुमच्या मुलीत गुण असावे असं वाटत असेल तर मुलींसाठी निवडा पुढील खास नावे. 

जिजाऊ

जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. फक्त आई म्हणून नाही तर मार्गदर्शक, गुरु म्हणूनही त्या कायमच छत्रपतींच्या मागे कायम उभ्या राहिल्या. जिजाऊंचे गुण आपल्या मुलीच्या जीवनात यावेत असं वाटत असेल तर लेकीसाठी 'जिजाऊ' हे नाव नक्कीच ठेवू शकता. 

जिजा 

तुम्ही जिजाऊ या नावाप्रमाणेच लेकीचं नाव 'जिजा' असं ठेवू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या नावावरुन हे नाव नक्कीच ठेवू शकता. अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऊर्मिला कानेकटरने आपल्या मुलीचं नाव 'जिजा' ठेवलं आहे.

ऐंदरी 

'ऐदरी' हे नाव 'इंद्रा' या नावावरुन घेण्यात आलं आहे. हिंदू पुराणशास्त्रानुसार देवाचा राजा इंद्र यांच्या नावावरुन हे नाव घेण्यात आलं आहे. या नावाचा अर्थ आहे सत्ता, ताकद आणि नेता. 

अपारजिता 

अपारजिता या नावाचा अर्थ आहे ताकद, शक्ती असा होता. ज्या मुलींमध्ये ताकद आणि प्रभावी असा गुण हवा असेल तर या नावाचा विचार करा. 

कियारा 

कियारा हे नाव अतिशय युनिक आहे. पण या नावाचा अर्थ शक्तिशाली, ताकदवान असा आहे. पण या नावातील अर्थ हा थेट जिजाऊंच्या गुणांशी संबंधित आहे. 

महिका 

महिका या नावाचा अर्थ आहे मॅजिकल पावर आणि दिव्य चैतन्य शक्ती. महिका हे नाव अतिशय युनिक आहे. मुलींसाठी या नावाचा विचार करु शकता. 

शक्ती 

शक्ती या नावामध्ये त्याचा अर्थ दडला आहे. हिंदू पौराणिक कथांमधील हे अतिशय शक्तिशाली नाव आहे. दिव्य शक्ती असा देखील याचा अर्थ आहे. 

शक्तिरुपा 

शक्तिरुपा हे नाव युनिक आहे. शक्तीचे रुप, शक्तीची ताकद असा या नावाचा अर्थ आहे. हे नाव चार अक्षरी असलं तरीही वेगळं आहे. 

विराली 

विराली हे नाव देखील वेगळं आहे. महिलांधील हिरो, शूर महिला असा याचा अर्थ आहे. युनिक नाव आहे.