www.24taas.com, झी मीडीया, मड्मेडू (तामिळनाडू)
तामिळनाडूच्या किनारपट्टीवर असलेल्या मड्मेडू या गावात शांती आणि तिचा पती स्वामीनाथन तीन मुलींसह राहतात. पण या तीन मुलींचा जन्म एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या तीन मुलींच्या जन्मापूर्वीच शांतीने आपली नसबंदी केली होती.
तुम्हांला ही चमत्कारीक वाटत असेल पण नाही हे खरं आहे.... २६ डिसेंबर २००४मध्ये हिंद महासागरात आलेल्या त्सुनामीमुळे शांतीच्या चार मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात कोणीतरी आधार देणारं हवं यासाठी त्यांनी नसबंदीच्या उलटचे ऑपरेशन केले.
२६ डिसेंबर २००४ ला आलेल्या त्सुनामीच्या सकाळी आठ वाजता शांती नेहमी प्रमाणे घरातील काम करत होती. तिची मुलं पाच वर्षांची मुलगी चेरन, चार वर्षांचा मुलगा चोलन आणि एक वर्षांचे दोन जुळी मुलं सतीश आणि शशिदेवी जवळच खेळत होते.
शांतीचा नवरा स्वामीनाथन मासेमारी करण्यासाठी गेला होता. काही क्षणातच जे काही झाले त्यामुळे दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर हजारो नागरिकांप्रमाणे या दाम्पत्याचे जीवनचं बदललं... लाख प्रयत्न केले तर मी मुलांना वाचवू शकली नाही असे शांतीने सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.