ठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच!
अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने मनसेच्या सात नगरसेवकांनी युतीच्या बाजुने मतदान केलं तर सेना-भाजपकडे ६६ इतकं संख्याबळ आधीपासून होतं.
Mar 7, 2012, 08:28 AM ISTउद्धव यांनी घातलं राजसमोर लोटांगण- आव्हाड
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेना-भाजप युतीचा महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. गेले दोन-तीन दिवस भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्या होत्या त्यावरुन सेना-भाजपने ठाणे बंद आणि महामोर्चा तसंच न्यायालयीन लढाई आणि हिंसक मार्गांचाही अवलंब केला त्या सुहासिनी लोखंडे अखेर सभागृहात अवतरल्या आहेत.
Mar 6, 2012, 07:26 PM ISTठाणे महापालिकेबाहेर वातावरण तणावपूर्ण
शिवसेना कार्यकर्ते-पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. महापालिकेत महापौर निवडणूकीसाठी आत जाण्यास कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केल्याने ही बाचाबाची झाली.
Mar 6, 2012, 04:44 PM IST