ठाणे महापालिकेबाहेर वातावरण तणावपूर्ण

शिवसेना कार्यकर्ते-पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. महापालिकेत महापौर निवडणूकीसाठी आत जाण्यास कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केल्याने ही बाचाबाची झाली.

Updated: Mar 6, 2012, 04:44 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

शिवसेना कार्यकर्ते-पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. महापालिकेत महापौर निवडणूकीसाठी आत जाण्यास कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केल्याने ही बाचाबाची झाली. ठाणे महापालिकेला अक्षरश: छावणीचे स्वरुप आलं आहे. ठाणे महापालिकेबाहेर पोलिस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाली. महापालिकेबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना-भाजपला जाहीर पाठिंबा दिल्याने सेनेचा महापौर होणार हे निश्चित आहे.

 

बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडेही सभागृहात अवतरल्या आहेत. लोखंडे बेपत्ता झाल्याने गेले तीन दिवस ठाण्यात रणकंदन माजलं होतं. शिवसेना-भाजपने ठाणे बंदचे आवाहन केलं होतं तसंच महामोर्चाही काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरुन महामोर्चाला परवानगी नाकारली. तसचं भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी लोखंडेंच्या अपहरणासंदर्भात उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस रिट दाखल केलं. सेना-भाजपच्या ठाणे बंदला हिंसक वळण लागलं आणि शिवसैनिकांनी अनेक बसेसची तोडफोड केली.   ठाणे महापालिकेबाहेर पोलिस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाली. महापालिकेबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.