शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टीचं ठिय्या आंदोलन
कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी संघटनेनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज ठप्प आहे.
Mar 20, 2012, 12:43 PM ISTऊस दरवाढीचा तिढा सुटणार?
ऊस दरवाढीचा तिढा सुटणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पवारांना मध्यस्थीची विनंती केल्यामुळं पवारांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली.
Nov 11, 2011, 03:16 PM ISTअखेर ऊस दराचा तिढा सुटला
अखेर ऊसदराचा तिढा सुटला, कोल्हापूर विभागात 2050 रू. पुणे विभागासाठी 1850 तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रू. दर निश्चित करण्यात आला आहे. लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सांगितलं आहे.
Nov 11, 2011, 03:12 PM ISTराजू शेट्टींना राज यांचा पाठिंबा
उसाच्या दरावरून शेतकरी संघटनेचा आमदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. सरकारने नाटक केल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होईल, अशी धमकी वजा इशारा राज ठाकरे यांनी आज मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
Nov 10, 2011, 11:51 AM ISTऊसाचा फड चांगलाच रंगतोय...
राज्यात अजूनही उसाचं आंदोलन पेटलेलंच आहे. या प्रश्नी पवारांनी मध्यस्थी करावी, असं म्हणत राजू शेट्टींनी पवारांच्या कोर्टात चेंडू टोलावला. तर शिवसेनाही आंदोलनात उतरली. एकीकडे महाराष्ट्रात हा प्रश्न पेटला असताना, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी उसाला 2800 रुपये भाव दिला. महाराष्ट्र सरकार मात्र उसाच्या प्रश्नावर विविध बैठका घेण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही.
Nov 8, 2011, 04:05 PM ISTराज ठाकरेही उसाच्या फडात
आमदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदरवाढ आंदोलनाला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माम सेनेनेही पाठिंबा दिला आहे. यासाठी मनसेच्या आमदारांचे शिष्टमंडळ पाठिंब्यासाठी बारामतीला रवाना झाले आहे.
Nov 8, 2011, 12:33 PM IST