राजू शेट्टींवर खुनाचा गुन्हा दाखल
दीड वर्षांपूर्वी झालेल्या ऊस आंदोलनात जखमी झालेल्या कान्स्टेबलच्या मृत्यूप्रकरणी स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.
Feb 10, 2014, 06:30 PM IST`ऊस कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलंय`
देशातील सध्याचं वातावरण हे द्वेशाचं आहे. मुंबईत कापड गिरण्याबंद पाडल्या, त्याप्रमाणे राज्यात ऊसाचे कारखाने बंद पाडण्याचं कंत्राट घेण्यात आलं आहे, असं शरद पवार यांनी खासदार राजू शेट्टी यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.
Feb 2, 2014, 02:37 PM ISTखासदार राजू शेट्टी यांनी `त्या` मुद्याला दिली तिलांजली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. पण खासदार राजू शेट्टी यांनी ज्या मुद्यावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी फारकत घेतली, त्याच मुद्याला आता शेट्टींनी तिलांजली दिल्याचं स्पष्ट होतंय.
Jan 8, 2014, 08:48 PM ISTराजू शेट्टी जातीयवादीच, आव्हाडांची टीका
राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.
Jan 7, 2014, 07:21 PM ISTशेतकरी नेते खासदार राजू शेट्टी मातोश्रीवर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मातोश्रीवर पोहोचले आहेत. यामुळे महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश होईल का?, या चर्चेला उधाण येणार आहे.
Jan 7, 2014, 12:50 PM ISTऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला
ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
Nov 28, 2013, 11:24 AM ISTअजित पवारांना उदयनराजे भोसलेंचा चिमटा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेजबाबदार वक्तव्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. मात्र, त्यांच्या आंदोलनाची खिल्ली राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उडविली. त्याचबरोबर जोरदार चिमटाही काढला.
Apr 15, 2013, 09:27 AM ISTही अजित पवारांची नौटंकी – राजू शेट्टी
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर शेतकरी संघटनेनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी हल्लाबोल चढविला. ही अजित पवार यांची नौटंकी आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.
Apr 14, 2013, 02:01 PM ISTराजू शेट्टींना जामीन मंजूर पण...
ऊसदर आंदोलनप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांना बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी तीन तालुक्यात प्रवेश बंदीही केलीय.
Nov 16, 2012, 01:28 PM ISTखासदार राजू शेट्टींची दिवाळी जेलमध्ये
ऊसाला ३००० रूपये दर देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन करणाऱ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यातच ऊसदरासाठी आंदोलन सुरु करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे यांच्यासह इतर सहा जणांना चौदा दिवसांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, देण्यात आली. त्यामुळे त्यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होत आहे.
Nov 13, 2012, 09:24 AM ISTकाकांचीही टगेगिरी.... पवारांचा संयम ढळला
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही टगेगिरीचा नमुना दाखवून दिला आहे. कधीही आपला संयम ढळू न देणारे शरद पवार यांचा काल मात्र तोल गेलाच...
Nov 13, 2012, 09:17 AM IST...नाही तर गाठ आमच्याशी आहे- राजू शेट्टी
चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.
Oct 28, 2012, 08:06 AM ISTCM ढोबळेंचा राजीनामा घ्या - राजू शेट्टी
पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ढोबळेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.
May 29, 2012, 03:52 PM ISTकांदा उत्पादक आक्रमक, मोर्चाचा इशारा
नाशिकमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांच्या आत शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर पालकमंत्री छगन भुजबळांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
May 26, 2012, 06:54 PM ISTमालेगावात पुन्हा 'कांदोलन'
कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेत.
Apr 17, 2012, 08:09 PM IST