raj thackeray rally

हा़यवे जाम करा..पण आजचा दिवस जपून - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उद्याच्या रास्तारोकोच्या पार्श्वभूमीवर राज यांना जमावबंदीची नोटीस जारी करण्यात आली असली तरी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जपून राहण्याचा सल्ला दिलाय. पोलिसांच्या अटकेपासून सावध राहा, असे राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

Feb 11, 2014, 02:19 PM IST

राज ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज यांना आपले आंदोलन करता येणार नाही. उद्याच्या रास्तारोकोच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावली. प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

Feb 11, 2014, 12:15 PM IST

राज ठाकरेंवर `सामना`तून जहाल टीका

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या १२ तारखेच्या आंदोलनाचे स्क्रिप्ट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलीम-जावेद यांनी लिहलंय, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामना`मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. मुझे अटक करो एकच नाटक नाव बदलून वारंवार रंगमंचावर येत असून त्यालास लोकाश्रय नसला तरी राजाश्रय लाभला आहे, अशी टीका या अग्रलेखात करण्यात आलीय. पाहूया या अग्रलेखात नेमकं काय म्हंटलं आहे.

Feb 11, 2014, 09:09 AM IST

राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांची नोटीस

राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीय. कलम १४९ च्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची ही नोटीस बजावण्यात आलीय. १२तारखेला राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मुंबईत निघणा-या मोर्च्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज ठाकरेंची असेल असं या नोटीशीत बजावण्यात आलंय.

Feb 11, 2014, 08:09 AM IST

'१२ तारखेपासून रास्तारोकोचं नेतृत्व, हिंमत असेल तर अडवा'

निवडणुकीचे दिवस जवळ येतात तसतसे राजकीय पक्षांच्या स्टार नेत्यांकडून सभांचा धडका लागलाय. पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा होतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा होतेय. एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा होतेय.

Feb 9, 2014, 07:35 PM IST

राज आजच्या सभेत या विषयांवर बोलतील?

राज ठाकरे यांच्यासाठी टोलचा मुद्दा सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जात असला, तरी राज ठाकरे पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतील का? याकडे मनसे, सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे.

Feb 9, 2014, 02:00 PM IST