railway

ठाणे-तुर्भे रेल्वेवर ट्रॅफिक ब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे-तुर्भे मार्गावर जादा लांबीचे रुळ टाकण्यासाठी आजपासून शनिवारपर्यंत दुपारी १२ ते दीड वाजण्याच्या दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. याची ठाणे नवी मुंबई प्रवाशांनी नोंद घ्यावी.

Nov 25, 2013, 09:28 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना गुड न्यूज आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी लक्षात घेऊन विशेष जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने केला आहे.

Nov 14, 2013, 09:59 PM IST

बरं का, तुर्कस्तानमध्ये समुद्रातून धावणार रेल्वे !

जगातील पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला आहे. तुर्कस्तानने आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडणारा पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू केलाय.

Nov 2, 2013, 05:26 PM IST

मुंबई लोकलमध्ये दबंगगिरी करणाऱ्या महिला काय सांगतात?

रेल्वेमध्ये दबंगगिरी महिलांवर कारवाई झाली तरी आमचा काहिही दोष नाही, अशी भूमिका कारवाई झालेल्या त्या सात महिलांनी मांडली आहे. दरम्यान, पुरुषांच्या डब्यात होणारी रोजची दादागिरी आता महिलांच्या डब्यातही होत असल्याचं यानिमित्तानं उघडकीस आलं.

Nov 1, 2013, 03:23 PM IST

लोकलमध्ये ‘दीदीगिरी’ करणाऱ्या महिलांना चाप

मुंबईच्या लोकल डब्यांमध्ये महिला ग्रुपच्या चालणाऱ्या दादागिरीविरोधात एका तरुणीनं आवाज तर उठवलाच शिवाय त्यांना न्यायालयात खेचून धडा शिकवला. बरखा मेघानी असं या तरुणीचं नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे.

Oct 31, 2013, 02:52 PM IST

<B>रेल्वेमध्ये नोकरीची संधी, १६२६ जागांसाठी भरती</B>

पूर्व-किनाऱ्यावरील रेल्वेमध्ये कुशल कामगारांचा १६२६ जागा उपलब्ध

Oct 28, 2013, 07:43 PM IST

मुंबईत दरवर्षी ६०० लोकल प्रवासी गमावता जीव

‘ओव्हरहेड वायर २५ हजार व्होल्टसने चार्ज आहेत, म्हणून गाडीच्या टपावरुन प्रवास करू नये. चालत्या ट्रेनबाहेर शरीर झोकून देणं, फुटबोर्डवर उभं राहणं धोकादायक आहे.’ अशी उद्घोषणा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर वारंवार केली जात असते.

Sep 26, 2013, 03:38 PM IST

रेल्वेचे वेटींग तिकिट काढू नका?

बातमी रेल्वेच्या आरक्षणासंदर्भात. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करतांना जर आता तुमच्याकडे यापुढं कन्फर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. वेटींग तिकिट असेल तरीही ते ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे रेल्वेत नो एंट्रीच.

Jul 23, 2013, 11:01 AM IST

वेटिंग तिकीट असेल तर घरीच बसा...

यापुढे तुम्ही जर वेटींग तिकीट घेऊन प्रवासाला निघत असाल तर टीटीई स्टाफ तुम्हाला कोणत्याही स्टेशनवर खाली उतरवून देऊ शकतो एव्हढच नाही तर तो तुमच्याकडून चांगलाच दंडही वसूल करू शकतो.

Jul 21, 2013, 10:24 AM IST

हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू, गती कमी

हार्बर मार्गावरील गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी दुपारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, युद्धपातळीवर काम करण्यात आल्यानंतर हार्बरची सेवा सुरू झाली आहे.

Jun 18, 2013, 06:15 PM IST

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती.

Jun 16, 2013, 10:06 AM IST

मंत्रालयात धडाडणार ‘रेल्वे सेल’

राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.

Jun 13, 2013, 08:34 AM IST

खूशखबर... रेल्वे आरक्षण आता २ महिने अगोदर

रेल्वे मंत्रालयाकडून आगाऊ तिकीट आरक्षण बुकिंग सेवेचा कालावधी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 26, 2013, 12:09 PM IST

गुड न्यूज : वसई-दिवा मार्गावर लोकल!

वसई - दिवा रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर... आता या रेल्वेला उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळं या मार्गावरुन लवकरच लोकल ट्रेन धावताना दिसणार आहेत.

Apr 4, 2013, 10:57 AM IST

रेल्वे, बस प्रवास आजपासून महाग

अर्थसंकल्पातील तरतुदी आज १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. याचा भार आता सामान्यांच्या खिशावर पडणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींसोबत रेल्वेचे आरक्षण आणि बेस्टचा प्रवासही महागणार आहे.

Apr 1, 2013, 06:40 AM IST