100-200 Cr नाही तर यंदाच्या Bigg Boss चं सुत्रसंचालन करण्यासाठी सलमान खाननं घेतले तब्बल 'इतके' कोटी!

Salman Khan Fees For Bigg Boss 18 : 'बिग गॉस 18' साठी सलमान खाननं घेतलं इतक्या कोटींचं मानधन

दिक्षा पाटील | Updated: Oct 7, 2024, 11:15 AM IST
100-200 Cr नाही तर यंदाच्या Bigg Boss चं सुत्रसंचालन करण्यासाठी सलमान खाननं घेतले तब्बल 'इतके' कोटी! title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Fees For Bigg Boss 18:  एक काळ होता जेव्हा बॉलिवूड चित्रपट हे 100 कोटींची कमाई करायचा आणि ही खूप मोठी गोष्ट मानली जायची. जशी वेळ गेली तसे 100 कोटींची कमाई कोणताही साधारण चित्रपट करतो असं होऊ लागलं. त्यानंतर सुपरस्टार हे एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपये मानधन घेऊ लागले. आताच्या काळात टीव्ही शोमध्ये इतका पैसा खर्च करतात ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सलमान खान आता हा सगळा रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. तो बिग बॉस या शोसाठी इतकं मानधन घेतो की त्याचा विचारही कोणी करु शकत नाही. 

'बिग बॉस 18' मध्ये कोणता स्पर्धक दिसणार त्याला घेऊन चांगलीच चर्चा रंगली आहे. 'बिग गॉस 18' साठी काही स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. पण अधिकृतपणे त्याची घोषणा प्रीमियर एपिसोडमध्ये होणार आहे. या स्पर्धकांच्या नावां शिवाय या सीजनमध्ये ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त चर्चा सुरु आहे, ते आहे सलमान खानचं मानधन. एका रिपोर्टनुसार, सलमान खान एक महिन्यासाठी 60 कोटी मानधन घेणार आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये सलमान खानचं नाव असणार आहे. त्यावरून हे सिद्ध होत आहे की त्या शोची टीआरपी ही नक्कीच वाढत चालली आहे. 

'बिग बॉस ओटीटी सीझन 3' चं सुत्रसंचालन हे सलमान खाननं नाही तर अनिल कपूरनं केलं होतं. तर एका रिपोर्टमध्ये HT नं सांगितलं की गेल्या सीझनच्या तुलनेत सलमान खाननं या सीझनमध्ये त्याचं मानधन वाढवलं. त्यानंतर अखेर एक महिन्यासाठी 60 कोटीच्या जवळपास असणार आहे. सूत्रांनुसार, हे सीझन 15 आठवड्यांसाठी असणार आहे. तर निर्माते सलमान खानला जवळपास 250 कोटी मानधन देणार असल्याचं म्हटलं आहे. सलमान खान जवळपास 15 वर्षांपासून टीव्हीच्या सगळ्यात मोठ्या रिअॅलिटी शोचं सुत्रसंचालन करत आहे. खरंतर त्याच्या सुत्रसंचालनाची प्रेक्षकांना इतकी सवय झाली आहे की आता त्याला रिप्लेस करणं कठीण झालं आहे. 

हेही वाचा : 63 वर्षांच्या सुनील शेट्टीला पाहताच नेटकऱ्यांच्याही नजरा वळल्या, 'म्हातारा होण्या ऐवजी तरुण कसा झाला!'

सलमान खानशिवाय अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी बिग बॉसचं सुत्रसंचालक केलं आहे. भारतात जेव्हा हा शो सुरु झाला होता तेव्हा पासून आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या कलाकारांनी शोचं सुत्रसंचालन केलं आहे. अरशद वारसी, अमिताभ बच्चन आणि संजय दत्तनं देखील एका-एका सीझनचं सुत्रसंचालन केलं आहे.