पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 16, 2013, 10:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती. दरम्यान, ही गाडी मुंबईकडे रवाना झाली आहे. दोन तास रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
आकर्डी जवळ सकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास रेल्वेची ओव्हरहेड मावय तुटली. महावितरणाची उच्च दाबाची वायर पडल्याने पुणे-मुंबई वाहतूक विस्कळीत झाली. ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस आणि लोक गाड्या थांबविण्यात आल्या.
पिंपरी स्थानकात थांबविण्यात आलेली डेक्कन क्वीन मुंबईकडे रवाना झालेय. हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे. पुण्यातही वासाचा जोर वाढलाय. लोणावळा शहरात २६५ मीमी पावसाची नोंद करण्यात आलेय. लोणावळ्यातील वाहतुकीवर या पावसाचा परिणाम दिसून येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.