political news

Gayatri Bishnoi : सौंदर्याची खाण असणाऱ्या 'या' तरुणीची राजकारणात दमदार एंट्री

Gayatri Bishnoi : ही तरुणी सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली आहे. निमित्त ठरतं ते म्हणजे त्यांची राजकारणातील एंट्री. 

Mar 28, 2023, 02:08 PM IST

Maha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा, पहिल्या सभेचा टीझर जारी

Maha Vikas Aghadi : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. येथे आघाडीचा प्रयोग झाला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने भाजपविरोधात राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त पहिल्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

Mar 28, 2023, 11:48 AM IST

Rahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी

Rahul Gandhi PC : लोकशाहीवर आक्रमण होत आहे.  मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.

Mar 25, 2023, 01:19 PM IST

Congress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?

Rahul Gandhi Disqualification :  राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.

Mar 25, 2023, 12:32 PM IST

Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावर कारवाई; वायनाड येथे 'काळा दिवस', तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन

Rahul Gandhi Disqualification :  राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केल्याच्या निषेधार्थ वायनाड येथे 'काळा दिवस' ​​पाळण्यात येणार आहे. तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

Mar 25, 2023, 11:50 AM IST

Karnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमधून काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

Mar 25, 2023, 10:16 AM IST

Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद

Rahul Gandhi PC :  खासदारकी रद्द झाल्यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांची ही पहिली पत्रकार परिषद आहे. दरम्यान, काँग्रेसकडून जनआंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राहुल गांधीप्रश्नी पक्ष त्यांच्या पाठिशी ठाम आहे. कारवाईविरोधात आवाज उठविण्यात येणार आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केलेय.

Mar 25, 2023, 09:16 AM IST

Supreme Court : ED, CBI च्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 5 एप्रिलला सुनावणी

Supreme Court  ED CBI : काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे. ईडी सीबीआयविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Mar 24, 2023, 11:39 AM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राज ठाकरे यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सांगलीतील मनसे कार्यकर्त्यांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी सांगलीच्या कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Mar 23, 2023, 02:16 PM IST

Political News : उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांची एकत्र एन्ट्री झाली आणि...

Maharashtra Budget Session : विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला.  

Mar 23, 2023, 01:14 PM IST

Political News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी

Political News : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे.  

Mar 21, 2023, 11:21 AM IST

Maharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Maharashtra Political News :  विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. दरम्यान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ( Supreme Court) नेण्यात आलं.  ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे. 

Mar 21, 2023, 09:55 AM IST

ईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. ( Political News ) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

Mar 11, 2023, 11:08 AM IST