ईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत. ( Political News ) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

Updated: Mar 11, 2023, 11:31 AM IST
ईडी छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, कोल्हापुरात एका कार्यकर्त्याने डोके फोडले title=

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्या घरावर आज पुन्हा छापे पडलेत. (ED Raid ) हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी राडा सुरू केलाय. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. एका कार्यकर्त्याने ठिय्या आंदोलनादरम्यान आपलं डोकं आपटून घेतले. मुश्रिफांच्या घराबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. ईडी अधिकाऱ्यांनी तातडीने परत जावे तसेच भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. ( ED Raids Hasan Mushrif House )  ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले. 10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक आलं आहे.  मुश्रीफ यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

हसन मुश्रीफ यांना दिलासा तर किरीट सोमय्या यांना झटका

ED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचे छापे

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) हे वृत्त समजताच कार्यकर्ते आणि समर्थक मुश्रीफ यांच्या घराकडे जमू लागलेत.  (Political News) पोलिसांनी त्यांना अटकाव केला. मात्र, मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एका कार्यकर्त्यांनी स्वत:चे डोके फोडून घेतले. यावेळी समर्थकांनी जोरदार राडा घातला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचे छापे

मुश्रीफ यांच्या घरी दूध देण्यासाठी एक व्यक्ती आला होता. यावेळी या  दूध देणाऱ्या व्यक्तीला CRF च्या जवानांनी विरोध केल्याने तणाव झाला. त्याचवेळी स्थानिक पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की सुरु झाली. त्यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले आहे.

दरम्यान, मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. यावेळी ईडीकडून चौकशीही करण्यात आली. ईडीने पुणे आणि कोल्हापूर येथे छापे टाकले होते. 11 जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने केली होती. कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर इडीने पहाटे एकाचवेळी कारवाई करीत छापे टाकले. यावेळी काही कागदपत्र जप्त करण्यात आली होती.

दरम्यान, आपल्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावेळी हायकोर्टाने मुश्रीफ यांना मोठा दिलासा दिला. . 24 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टानं पोलिसांना दिलेत. तर भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना त्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते, असा सवाल हायकोर्टाने विचारला. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.