Rahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी

Rahul Gandhi PC : लोकशाहीवर आक्रमण होत आहे.  मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.

Updated: Mar 25, 2023, 01:54 PM IST
Rahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी title=

Rahul Gandhi PC : राहुल गांधी यांनी मोदी आणि अदानीसोबतच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केला. लोकशाहीवर आक्रमण होत आहे. मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मी लोकसभा सभापती यांच्याशी चर्चा केली. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, हे मी विचारत राहणार. मी कोणालाही घाबरत नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी कितीही कारवाई झाली तरी मी सरकारला प्रश्न विचारणार, असा इशारा यांनी त्यावेळी दिला.

लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदाच मीडियासमोर आपली बाजू मांडली. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मानहानीच्या प्रकरणात सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करुन त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. त्यानंतर अनेक सवाल करत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. मी घाबरणारा नाही. माझा असा इतिहास नाही. मी प्रश्न विचारत राहीन, हे बंद करणार नाही. अपात्र ठरवून, धमकावून मला रोखणे शक्य नाही. माझ्याबद्दल खोटे बोलले जात आहे. मला घाबरवून हे लोक मला गप्प करु शकत नाही, असे राहुल यावेळी म्हणाले. त्याचवेळी कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राहुल गांधी म्हणाले की, मी आधीही म्हटल्याप्रमाणे आपल्या देशात लोकशाहीवर हल्ला होत आहे. याची नवनवीन उदाहरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अदानी यांच्या शेल कंपन्या आहेत. त्यात 20 हजार कोटींची गुंतवणूक आहे. ते पैसे कोणाचे आहेत? अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते जुने आहे. नियमात बदल करुन विमानतळ अदानी यांना देण्यात आले. याबाबत मी सभापतींना अनेक पत्रेही लिहिली आहेत. लोकसभा सभागृहात मला बोलू का दिले जात नाही? यानंतर काय झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले आहे? मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. मोदी आणि अदानी यांचे नाते काय? ते 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत, हे मी सातत्याने विचारत राहणार आहे, असे राहुल म्हणाले.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

- मी अनेकदा म्हटलेय की, भारतात लोकशाहीवर हल्ला होत आहे. लोकशाहीवर आक्रमण होत आहे
- मी सातत्याने सरकारला प्रश्न विचारणार. मी अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हा पैसा कोणाचा आहे, हे त्यांनी सांगावे. 
- मी संसदेत याबाबत पुराव्यानिशी बोललो आहे. परंतु मला संसदेत बोलू दिले जात नाही.
- मोदी आणि अदानी यांचे नाते जुने आहे. दोघांचे फोटोही दाखवले आहेत.
- संसदेतील माझे भाषण काढून टाकण्याबाबत मी अध्यक्षांना पत्र लिहिले.
- भाजप मंत्र्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगतले. मी विदेशातून कोणतीही मदत घेतलेली नाही.

- मी अध्यक्षांना दोनवेळा पत्र लिहिली. त्यांचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. मी याबाबत अध्यक्षाना भेटलो आणि बोललो.
- मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. मी या (भाजप) लोकांना घाबरत नाही. मी अदानी आणि मोदी यांच्यातील संबंधांबद्दल बोलत राहणारच.