pm manmohan singh

मी पंतप्रधान आहे तेच बरयं- मनमोहन

पंतप्रधान मनमोहन सिंग युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील ही अटकळ खुद्द पंतप्रधानांनीच फेटाळून लावली आहे. जिथं आहे तिथं मी खूष आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

May 30, 2012, 03:40 PM IST

आरोप सिद्ध झाले तर राजीनामा - पीएम

टीम अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिले आहे. टीम अण्णांनी केलेले आरोप बेजबाबदारपणे केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेऊ, असेही ते म्हणाले.

May 30, 2012, 07:56 AM IST

अण्णांनी दिली पंतप्रधांना क्लीन चिट

पंतप्रधानांवरील आरोपांवरून टीम अण्णांमधले मतभेद उघड झाले आहेत. टीम अण्णांनी कोळसा घोटाळ्य़ावरून पंतप्रधानांना टार्गेट केलंय. तर अण्णांनी मात्र पंतप्रधांना क्लीन चिट दिली आहे.

May 26, 2012, 10:02 PM IST

पवारांची नाराजी : पंतप्रधानांनी बोलावली बैठक

कापूस आणि साखर निर्यात धोरणाबाबत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज पंतप्रधानांनी कॅबिनेटची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Apr 30, 2012, 02:06 PM IST

पतंप्रधानांना भेटणार लष्करप्रमुख

लष्करप्रमुख जनरल व्हि के सिंग आज पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग आणि संसक्षणमंत्री ए के अन्टोनी यांनी भेटण्याची शक्यता आहे. पतंप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी लष्करप्रमुखांनी वेळ मागितला आहे.

Mar 30, 2012, 12:29 PM IST

सरकार लष्करप्रमुखांची हकालपट्टी करणार का?

लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलावली. लष्करप्रमुखांनी सेनादलाकडे असलेला शस्त्रसाठ्याच्या कमतरतेने आणि यंत्रणेतील त्रुटींमुळे देशाची संरक्षण व्यवस्थेला धोक आल्याचा इशारा आपल्या पत्रात दिला आहे.

Mar 28, 2012, 01:25 PM IST

पंतप्रधान आता युट्युबवरही...

पंतप्रधान कार्यालयाने आता युट्युबवरही पदार्पण केलं आहे. याआधी ट्विटरच्या माध्यमातून लोकांसी संवाद साधण्याचा उपक्रम पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हाती घेतला होता. आता युटयुबवर व्हिडिओ अपलोड करुन त्याद्वारे लोकांशी पंतप्रधान कार्यालय संवाद साधणार आहे.

Mar 12, 2012, 12:44 PM IST

सलमान खुर्शीद यांचं मंत्रिपद जाणार?

निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटीसनंतरही वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील कारवाईसंबंधी स्वतः पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगच निर्णय घेण्याची शक्यता आहे. खुर्शीद प्रकरणाची दखल घेऊन पंतप्रधान सोमवारी एक बैठक घेण्याचीही शक्यता आहे.

Feb 13, 2012, 10:20 AM IST

इम्रानच्या आयुष्यातील सन्मानाचा क्षण

मॉरेशिसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा यांच्या सन्मानार्थ आयोजीत स्टेट डिनर म्हणजे सरकारी मेजवानीला बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आमंत्रित केलं होतं.

Feb 8, 2012, 03:04 PM IST

सरकारने देशाची फसवणूक केली- अण्णा हजारे

मुंबई लोकपाल आंदोलनाचा फज्जा उडाल्यानंतर पहिल्यांदाच मौन सोडत अण्णा हजारेंनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं. या पत्रात अण्णा यांनी सरकारने संसदेत कमकुत लोकपाल विधेयक सादर करुन लोकांची फसवणूक केल्याचं म्हटलं आहे

Jan 22, 2012, 10:58 PM IST

अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार

जगभरातील भारतीयांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आता अनिवासी भारतीयांना देशातील निवडणूक प्रक्रियेत सहभाग तसंच मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सार्वत्रित निवडणुकांमध्ये अनिवासी भारतीयांना मतदान करता यावं यासाठी कायदा पारित करण्यात आला. आणि त्या अंतर्गत परदेशातील भारतीय मतदारांच्या नोंदणीसाठी निर्देश जारी करण्यात आल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं.

Jan 8, 2012, 02:47 PM IST

'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही'- पीएम

भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कधी नव्हे ते पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत गिलानी यांचा समाचार घेतला आहे. 'आंधळेपणाने विश्वास टाकता येणार नाही' अशा भाषेत 'गिलानी' यांना भारत आता कोणाताही 'गलथानपणा' करणार नाही हेच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

Nov 13, 2011, 05:16 AM IST