पतंप्रधानांना भेटणार लष्करप्रमुख

लष्करप्रमुख जनरल व्हि के सिंग आज पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग आणि संसक्षणमंत्री ए के अन्टोनी यांनी भेटण्याची शक्यता आहे. पतंप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी लष्करप्रमुखांनी वेळ मागितला आहे.

Updated: Mar 30, 2012, 12:29 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

लष्करप्रमुख जनरल व्हि के सिंग आज पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग आणि संसक्षणमंत्री ए के अन्टोनी यांनी भेटण्याची शक्यता आहे. पतंप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी लष्करप्रमुखांनी वेळ मागितला आहे.

 

 

गेल्या काही दिवसांपासून लष्करप्रमुख आणि केंद्र सराकर याच्यावत विसंवाद निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय. १४ कोटी रुपये लाच दिल्याचं प्रकरण,  त्यांनंतर लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना दिलेलं पत्र, ते माध्यमाकडे फुटल्याचं प्रकरण या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.

 

 

दिल्लीत सुरु असलेला लष्करप्रमुख आणि सरकारमधला संघर्ष, अण्णा विरुद्ध संसद वाद या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपली रोखठोक मतं मांडताना अण्णा आणि लष्करप्रमुखांना टार्गेट केले.  देशाकडे पुरेशी शस्त्र नाहीत असं पत्र लिहून लष्करप्रमुखांनी देशाला नागवं केलं, अशा शब्दांत बाळासाहेबांनी या वादावर नाराजी व्यक्त केली.

 

 

लष्करप्रमुखांनी पत्र लिहिण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून हे सांगायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडले. अण्णा म्हणजे परदेशी पैशावर नाचणारे मोर आहेत, अशी खोचक टीका बाळासाहेबांनी केली.... देशातील सध्याच्या महत्वाच्या घडामोडींवरील ही ठाकरी मतं बाळासाहेबांनी झी २४तासकडे मांडली. शिवसेना डायरीचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.