पुण्यात आघाडीची खेळी, भाजप-सेनेच्या याद्या रखडल्या...
पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमुळे भाजप , सेनेची यादी रखडलीय. कारण जोपर्यंत त्यांच्यातील आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वतःचे उमेदवार जाहीर करायचे नाहीत अशी भूमिका भाजप, सेनेनं घेतलेली दिसतेय. उमेदवार टंचाईच्या काळात पत्ता कट झालेले ताकदवान मासे आपल्या गळाला लागतात का याची अपेक्षा हे पक्ष बाळगून असण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2017, 08:51 PM ISTपुण्यात राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीतील वादाचे मुद्दे
पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. त्यात आघाडी बाबत काँग्रेस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, आज संध्याकाळ पर्यंत आघाडीचा निर्णय जाहीर होईल किंवा आमच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आली आहे.
Jan 30, 2017, 05:16 PM ISTपिंपरीत शिवसेनेला दिला भाजपने ८८-६४ चा फॉर्म्युला
अपेक्षे प्रमाणे पिंपरी चिंचवड मध्ये युतीचं घोडं जागा वाटपावर अडकलंच.... १२८ पैकी तब्बल ८८ जागांवर भाजपने दावा ठोकलाय तर शिवसेनेनं निम्म्या म्हणजेच ६४ जागा देण्याची तयारी ठेवलीय.
Jan 18, 2017, 10:56 PM ISTमहापालिका निवडणुकांत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा प्रमुख...!
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकांचा पट सजला असताना प्रचारात अनेक मुद्दे पुढं यायला लागलेत...! त्यातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामाचा...! लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही त्याची मोठी किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागली. आता गेली अडीच वर्ष सत्तेत असून ही भाजपला हा प्रश्न सोडवता आलेला नाही...! त्यामुळं हा मुद्दा महापालिका निवडणुकीत गाजणार अशीच चिन्ह आहेत...!
Jan 6, 2017, 06:20 PM ISTअजित पवार : महापालिकेच्या चक्रव्युहातील अर्जुन की अभिमन्यू....!
अजित पवार... राज्यातील राजकारणातले एक प्रमुख नाव...शरद पवार यांच्या सावलीत मोठे झालेले हे नेतृत्व असले तरी कामाच्या शैलीने स्वतःच राजकीय अस्तित्व बनवलेले हे व्यक्तिमत्व.
Nov 30, 2016, 06:20 PM ISTमहापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करतायेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलय..
Nov 16, 2016, 07:59 PM IST