कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकांचा पट सजला असताना प्रचारात अनेक मुद्दे पुढं यायला लागलेत...! त्यातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामाचा...! लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही त्याची मोठी किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागली. आता गेली अडीच वर्ष सत्तेत असून ही भाजपला हा प्रश्न सोडवता आलेला नाही...! त्यामुळं हा मुद्दा महापालिका निवडणुकीत गाजणार अशीच चिन्ह आहेत...!
अनधिकृत बांधकामं नियमित केली जाणार असं गाजर पिंपरी चिंचवडकरांना या पूर्वी वेळो वेळी देण्यात आलं...आघाडी सरकार ही त्यात मागे नव्हतं....! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही त्यामुळं राष्ट्रवादीचा खासदार सोडा, एक आमदार पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यात आला नाही...
त्याची पुरती कल्पना भाजपाला असल्याने तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दोनदा अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची घोषणा केली..पण दुर्दैवाने पिंपरी चिंचवाडकरांसाठी ते आश्वासनच ठरले आणि हा प्रश्न आज ही लटकलेलाच आहे. त्यामुळं महापालिका निवडणुकीत हा मुद्दा प्रमुख ठरणार अशीच चिन्हे आहेत. एकीकडं हा प्रश्न सोडवण्यास अपयश आलेल असताना ही भाजप हा प्रश्न सोडवण्याचा दावा करतेय...!
दुसरीकडं राष्ट्रवादीने आम्ही हा प्रश्न सोडवण्यास प्रामाणिक प्रयत्न केल्याचं सांगत भाजप यावर राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केलाय...
महापालिका निवडणुकांची आचारसंहिता केंव्हा हे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासंबंधी काही निर्णय होईल अशी शक्यता नाही. त्यामुळं आता महापालिका निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा गाजणार अशीच चिन्ह आहेत...!